जळगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करेक्ट कार्यक्रम होणार!

जळगाव जिल्ह्याचे राजकारण आता नवीन वळण घेत आहे.
Eknath Shinde.jpg
Eknath Shinde.jpg

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे राजकारण आता नवीन वळण घेत आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते व राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री घेतली आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता खालसा करण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे दिसत आहे.

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांचे तब्बल 57 नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे केवळ 15 नगरसेवक आहेत. अशा स्थितीत सत्ता बदल अशक्य आहे. मात्र, भाजपच्या तब्बल 31 नगरसेवकांनी बंड केले. आणि ते शिवसेना पक्षाला मिळाले. या बंडा अगोदर शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यतील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच भाजपच्या बंड करणाऱ्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला.

जळगावात होत असलेले सत्तांतर व भविष्यात विकासासाठी सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली. त्यानंतर फुटलेले नगरसेवक ठाणे येथे त्यांचाच अखत्यारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या आश्वासनानंतरच जळगावात भाजपचे नगरसेवक फुटल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे फुटीर नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न केला परंतु हे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असल्याने ते शक्य झाले नाही. 

आता उद्या (ता.18 मार्च) महापौर निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी नगरसेवक भकम्म असल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात ते शिंदे यांच्या संपर्कात राहणार आहेत. जळगावात महापालिकेवर भगवा फाडकविण्यात शिदे यांचा मोठा वाटा आहे. त्याची ही जळगाव जिल्यातील राजकारणात एन्ट्री मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणखी बळकट होणार का हे आगामी काळात दिसून येईल. 

जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे 27 नगरसेवक फुटले होते. त्यानंतर भाजपचे आणखी 4 नगरसेवक फुटले त्यामुळे फुटलेल्या नगरसेवकांची संख्या 31 झाली आहे. महापालिकेत महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. या शिवाय आणखी नगरसेवक संपर्कात असून 36 नगरसेवक यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार आहे. शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित झाले आहे. तर उपमहापौर पद भाजपच्या फुटीर गटाला देण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com