राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? : वडेट्टीवार आणि मुनगंटिवार यांचे असेही एकमत

अनेक नेेते राज्यपालांना भेटत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता व्यक्त होत आहे...
mungantiwar-vadettivar
mungantiwar-vadettivar

चंद्रपूर : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. त्यातच राज्यपाल भवनात सर्वपक्षीय नेत्यांची वर्दळ वाढल्याने राजकीय भूकंप होईल, अशी चर्चा आहे. मात्र बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी अर्थराज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनीही राष्ट्रपती राजवटीची शक्यता फेटाळून लावली.

राष्ट्रपती राजवटीचा प्रश्नच येत नाही. एवढेच असेल तर महाराष्ट्राआधी गुजरात मध्ये राष्ट्रपती राजवट लावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी भाजपला दिला तर मुनगंटीवार यांनी राणे यांची मागणी वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी सबंध नाही, असे सांगत हात झटकले.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा फक्त माध्यमात आहे. कोरोनाचे संकट नैसर्गिक आहे. हे केंद्र सरकारचे पाप आहे. देशात पहिला कोरोनाचा रू़ग्ण मिळाला तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करायला हवी होती. दिल्लीत मरकजच्या कार्यक्रमाला केंद्राने परवानगी दिली. ट्रम्पचे स्वागत कुणी केली? असा सवाल वडेट्टीवारांनी भाजपला केला. मुंबई गजबजलेले केंद्र आहे. तिथे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची काय? मग याच न्यायाने गुजरातमध्ये आधी लावावी लागेल. काल न्यायालयाने गुजरात सरकारवर कोरोनाच्या आपत्तीवर हलगर्जीपणा केला म्हणून ताशेरे ओढले आहे. कुणी काय मागणी करावी, हे प्रत्येकाच्या सद्सदविवेक बुद्धीला धरून आहे.आम्ही तीनही पक्ष सोबत आहोत. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी राज्यसरकार खंबीरपणे उभे आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी राणे यांची वैयक्तिक मागणी असल्याचे म्हणत ती महाराष्ट्राच्या जनतेच्या हितापोटीच केली असल्याचे म्हटले आहे. कोरोना संकटाने मुंबई अडचणीत असल्याचे बघितल्यावर राणे अस्वस्थ झाले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मुंबई मनपाकडे असणा-या मुदत ठेवी जनतेच्या हितासाठी वापरण्याऐवजी राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. कोरोनाचे नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारने विविध पॅटर्नचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आपली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com