RFO दिपाली चव्हाण आत्महत्या : DFO शिवकुमार निलंबित..रेड्डींना पदावरून हटविले...

उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना शुक्रवारी रात्री अटक केली आहे.
vinod26.jpg
vinod26.jpg

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरूवारी रात्री हरीसाल येथील शासकीय निवासात वरिष्ठाच्या छळाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उलबांगडी करण्यात आली आहे. रेड्डी यांना वन बल कार्यालयात तात्पुरती हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनोद शिवकुमार यांना गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागचा तात्पुरता प्रभार सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार याच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

"माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे," असे दिपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. "माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या," असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

विनोद शिवकुमार यांना अटक केल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका दीपालीच्या कुटुंबीयांनी काल घेतली होती. प्रशासनाने कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर काल सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अंत्यसंस्कार रात्री उशिरा मोरगाव येथे करण्यात आले. या घटनेला मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीसुदधा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप चव्हाण कुंटुबियांनी केला आहे. 

दीपाली यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Edited  by :  Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com