"DFO शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या.." महिला आक्रमक (व्हिडिओ) - RFO Deepali Chavan case DFO Shivkumar custody Women aggressive in Dharani court | Politics Marathi News - Sarkarnama

"DFO शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या.." महिला आक्रमक (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

शिवकुमार यांना कोर्टात नेत असतांना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या.

नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरूवारी रात्री हरीसाल येथील शासकीय निवासात वरिष्ठाच्या छळाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणातील आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. महिलांनी आज पोलिस ठाण्यात धडक देत आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी केली.  

यावेळी आरोपी शिवकुमार यांना कोर्टात नेत असतांना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या, यावेळी पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले. यावेळी ज्या वाहनांतून आरोपी विनोद शिवकुमारला पोलिस धारणी न्यायालयाने घेऊन जात होते, त्या वाहनाला महिलांनी पूर्णपणे घेरलं होते. यावेळी शिवकुमार यांच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या. यावेळी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी वनविभागाच्या महिला कर्मचारी वर्गाने केली. यावेळी धारणीच्या न्यायालयात आरोपीला नेताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आक्रमक झाल्या होत्या.

याप्रकरणी अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उलबांगडी करण्यात आली आहे. रेड्डी यांना वन बल कार्यालयात तात्पुरती हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनोद शिवकुमार यांना गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागचा तात्पुरता प्रभार सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार याच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

दीपाली यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख