आता पटोलेंवर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही : प्रफुल्ल पटेल

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी ईडीने छापा टाला त्यावर पटेल म्हणाले, ते न्यायिक प्रकरण असून त्यात अनेक उपाय आहेत.
 Praful Patel .jpg
Praful Patel .jpg

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही कोणत्याही प्रकारची राजकिय नव्हती. सहकार बँकिग क्षेत्रात अनेक बदल झालेले आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यामुळे कुणी या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी रविवारी गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलून पवार-मोदी भेटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (Praful Patel said about Nana Patole)  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा प्रसिद्धीसाठी करत आहेत का असे विचारले असात पटेल म्हणाले, या बोलण्यावर आम्ही आता पडदा टाकला आहे. त्यामुळे नानांबद्दल नवीन बोलून वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आता पटोलेंबद्दल बोलण्यास माझी मुळीच इच्छा नसल्याने, पटेल म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की ईडी अर्ध्या रात्री कुणालाही अटक करू शकते, यावर प्रश्न विचारला असता, पटेल म्हणाले समोर काय होते ते पुढच्या पूढे पाहू, असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी ईडीने छापा टाला त्यावर पटेल म्हणाले, ते न्यायिक प्रकरण असून त्यात अनेक उपाय आहेत.

चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी नाशिकमध्ये भेट झाली. त्याविषयी विचारले असता पटेल म्हणाले, कोणकोणाला भेटते, आता भेटून नवीन काही घडत असेल तर आम्हीही दररोज भेटायला तयार आहोत. भेटल्याने काहीच होत नाही. प्रत्येक पक्षाची एक पॉलिटिकल लाईन असते त्या पॉलिटीकल लाईनप्रमाणे प्रत्येक पक्ष काम करीत असतो, ज्याचप्रमाणे महाविकास आघाडीची लाईन ठरली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतो, असे त्यांनी सागितले.  

Edited By - Amol Jaybhaye    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com