राठोडांवर आरोप करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी घेतला अडीच तास जबाब

तब्बल अडीच तास बंद‍ खोलीत संबंधित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला.
Police recorded statement of the woman who accused Sanjay Rathore
Police recorded statement of the woman who accused Sanjay Rathore

यवतमाळ : शिवसेनेचे माजी मंत्री आणि दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करणाऱ्‍या महिलेने आज (ता. 14 ऑगस्ट) घाटंजी पोलिस ठाण्यात हजर राहून चौकशी पथकासमोर जबाब दिला. तब्बल अडीच तास बंद‍ खोलीत संबंधित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. मात्र, जबाबात त्या महिलेने नेमके काय म्हटले आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली नाही. (Police recorded statement of the woman who accused Sanjay Rathore)

घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने आमदार संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार बुधवारी (ता. 11 ऑगस्ट) स्पीड पोस्टने यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक व ठाणेदार घाटंजी यांच्याकडे केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष चौकशी पथक नेमले आहे. पथकप्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. 

या पथकामध्ये अवधूतवाडीचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे, घाटंजी ठाणेदार बबन कराळे, प्रभारी सायबर सेलप्रमुख, प्रभारी महिला सेल, भरोसा सेल येथील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 13) संबंधित महिलेचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने तिने जबाब नोंदविण्यास नकार दिला होता. 

दरम्यान, आमदार संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन संबंधित महिलेच्या आरोपाचे खंडन केले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तक्रारकर्ती महिला शनिवारी (ता. 14) घाटंजी पोलिस ठाण्यात हजर झाली. चौकशी पथकाने तिची अडीच तास बंदद्वार चौकशी केली आणि तिचे जबाब नोंदवून घेतले. परंतु, जबाबात तिने नेमके काय म्हटले आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली नाही. याबाबत पोलिसांकडून लवकरच खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com