पंतप्रधानांच्या हस्ते करणार बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण करणार :  नवनीत राणा

नवनीत राणा यांनी काल कारखाना बांधकामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.
MP Navneet Rana.jpg
MP Navneet Rana.jpg

अमरावती :  अमरावती (Amarawati)  जवळील बडनेरातील रेल्वे वॅगन (railway wagon factory )  दुरुस्ती कारखान्याचे उभारणीचे काम युद्धस्तरावर  सुरु आहे. हे काम करण्यासाठी कोरोना काळातही खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)  यांनी ८० कोटींचा निधी मिळवून दिला. पुढील वर्षापर्यंत या कारखान्याचे काम पुर्ण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते कारख्यान्याते लोकार्पण करण्यात येणार आहे, असा संकल्प नवनीत राणा यांनी केला आहे.  १९६ एकर जमिनीवर साकारणार हा प्रकल्प उभारला जाणार आहे. बडनेरातील पाचबंगला परिसरातील उत्तमसरा मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना उभारला जात आहे. 

दरम्यान, नवनीत राणा यांनी काल कारखाना बांधकामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात  आहेत. तर, उरलेली सर्व कामे फेब्रुवारी २०२२  पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’करून त्यांना दंड ठोठावला जाईल अशी असा इशाराही खासदार राणा यांनी दिला आहे. 

विशेष म्हणजे, या प्रकल्पाशेजारी प्रशस्त इमारत, २०० निवासस्थाने  आणि कारखान्याचे शेड उभारले जाणार आहेत. पाटणा येथील रेल्वे बांधकाम विभागावर  रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपविली आहे. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते कंत्राटदार नेमून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासह विविध बाबी पाटणा रेल्वे बांधकाम विभागाला पूर्ण कराव्या लागणार आहेत.

बडनेरा जुना महामार्गवरून जाणाऱ्या  अमरावती- बडनेरा रेल्वे लाईनवर खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या अथक प्रयत्नांनी जुनी वस्ती येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग  मंजूर झाला. या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा खासदार  राणा यांनी  केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com