चिखलात जाऊन नुकसानग्रस्तांची पाहणी करताना खासदारांना अश्रू अनावर - navneet rana gets teary eyes seeing devastating scenes-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

चिखलात जाऊन नुकसानग्रस्तांची पाहणी करताना खासदारांना अश्रू अनावर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 जुलै 2021

नवनीत राणा यांनी भर चिखलातून पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

अमरावती : मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती Amravati जिल्ह्यात सुरु आहे, त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झाल आहे. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहता आहेत. तर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा navneet rana थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे. 

यावेळी नवनीत राणा यांनी भर चिखलातून पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झालेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पाहावी.  स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तर तुम्हाला त्यांची व्यथा कळणार नाही. त्यांना मदत कशी दिली जाणार, असा प्रश्न थेट खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
 
राज्यात पावसाचा कहर सुरू असूनविदर्भ-अमरावती जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाची नोंद झाली असून ,शासन निकषानुसार तत्काळ पंचनामे करण्यात यावे व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत आपदग्रस्तांना भरीव मदत मिळावी व त्यांची झालेली हानी भरून निघावी यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन राणा यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.

जळगावात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार  
जळगाव :  जळगाव महापालिकेचे उपमहापौर  jalgaon deputy mayor कुलभूषण पाटील kulbhushan patil यांच्यावर चारचाकीतून पाठलाग करत सहा ते सात जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील मयूर कॉलनी येथे घडली. संशयित पाठलाग करत कुलभूषण पाटील यांच्या घरी आले व या ठिकाणी त्यांनी तीनवेळा फायर केले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख