नागपूर पुन्हा हादरले; 48 तासांत तीन खून 

या खूनसत्रामुळे नागरीक भीतीच्या छायेत आहेत.
Nagpur shook again; Three murders in 48 hours
Nagpur shook again; Three murders in 48 hours

नागपूर : नागपूर शहरात गेल्या 48 तासांत तीन खून झाले आहेत. या खुनाच्या घटनांनी उपराजधानी पुन्हा हादरली आहे.

शनिवारी (ता. 17 ऑक्‍टोबर) मानकापुरात बनारसी नावाच्या युवकाचा निक्की शैलेंद्र गायकवाड (म्हाडा क्वॉटर्स, पिटेसूर रोड, गोधनी रेल्वे) याने दगडाने ठेचून खून केला. रविवारी (ता. 18 ऑक्‍टोबर) रात्री यशोधरा नगरात राजू रंभाळ या युवकास दोघांनी चाकूने भोसकून ठार केले, तर रविवारी रात्री आठच्या सुमारास गोलू राजपूत या तडीपार कुख्यात गुंडाचा दोघांनी खून केला. या खूनसत्रामुळे नागरीक भीतीच्या छायेत आहेत. 

दरम्यान, नात्यातील तरुणीची वारंवार छेड काढून त्रास देणाऱ्या तडीपार कुख्यात गुंडाचा दोघांनी चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री उप्पलवाडी परिसरात घडली. गोलू उर्फ दिपक देशराज राजपूत (वय 26, रा. कडू लेआऊट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना कपिलनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रात्र होताच गुन्हेगार सक्रीय होत अनेक गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. कपिल नगरातील हत्याकांडात गोलू राजपूत हा कुख्यात गुंड असून सध्या तो तडीपार होता. त्याच्या विरुध्द पोलिस ठाण्यात चोरी, मारहाण आणि लुटमार करण्याचे गुन्हे दाखल आहेत. तो वस्तीत नेहमी दादागिरी करतो. तो वस्तीतील तरुणी आणि महिलांची छेडछाड करत असत. 

गेल्या काही दिवसांपासून तो आरोपी तक्षशिला नगरमधील तुषार गजभिये (वय 24) याच्या नात्यातील तरुणीला त्रास देत होता. टोमणे मारणे किंवा शेरेबाजी करीत होता. ही बाब त्या तरुणीने तुषार याला सांगितली. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याने गोलू राजपूतचा थेट काटा काढण्याचा प्लान केला.

त्यानुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास गोलू राजपूत उप्पलवाडी परिसरात दिसला. आरोपी तुषार गजभिये आणि टोनी उर्फ प्रेम मारोतकर (वय 23, स्वामीनगर, नारी रोड) याला फोन केला. दोघेही उप्पलवाडीत पोहचले. गोलूला रस्त्यातच गाठले. त्याला पकडून विटा भट्टीकडे नेले. तेथे अंधारात गोलूवर तलवार आणि चाकूने सपासप वार करीत ठार केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

 Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com