"पक्ष विसरुन काम करा..सेवाकामाचे झेंडे लावू नका..." गडकरींचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला 

सरकारनामा ब्युरो
Monday, 10 May 2021

सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका, असे गडकरी म्हणाले.

नागपूर : "सेवा कामाचा प्रचार करणं चुकीचंआहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे, जात, पक्ष विसरुन हे काम केले पाहिजे. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण," असे मत भाजपचे BJPनेते, केंद्रीय नेते नितीन गडकरी Nitin Gadkariयांनी व्यक्त केले. पक्षाचे कार्यक्रर्ते, पदाधिकारी यांना ते सोशल मीडीयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत होते. Nagpur BJP leader Nitin Gadkari advice to BJP office bearers

नितीन गडकरी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकारण केलं तर लोकांना ते आवडतं नाही. तुम्ही जे करणार आहेत. त्यांचे श्रेय तुम्हाला आणि पक्षाला मिळणारच आहे. आपल्या सेवाकार्याचा लोकांना माहित होणं इथपर्यंत प्रचार करणं गरजेचे आहे. त्यांचा फार बागुलबुवा करु नका, सध्याच्या काळात सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. यात राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका. 

"कोविडमुळे त्यांच्या मृत्यू झाला त्यांच्या कुंटुबियांना मदत करा. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करा. अनेक पदाधिकारी, कार्यक्रर्ते, विरोधक यांना मदत करणे ही काळाजी गरज आहे. कोरोना लसीकरण चळवळ पुढे नेली पाहिजे. नागपूर महापालिकेने महापालिकेच्या जुन्या बसच्या अॅम्बुलन्स केल्या  हा उपक्रम कौतुकास्पद आहे.


 
आपले आरोग्य कसं चांगले राहिलं, याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, आपली आर्थिक व्यवस्था, त्यानंतर समाज यांचा विचार करावा. भावनेच्या भरात आपण आपले कर्तव्य विसरुन जातो, स्वःताकडे ही लक्ष देत नाही, गाफील राहू नका, स्वःताची काळजी घ्या, असा सल्ला यावेळी गडकरी यांनी दिला. 

गडकरी म्हणाले की , सध्याच्या काळात सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. यात राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका, तुम्ही हे काम करीत आहात हे लोकांना माहित आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकारण केलं तर लोकांना ते आवडतं नाही. तुम्ही जे करणार आहेत. त्यांचे श्रेय तुम्हाला आणि पक्षाला मिळणारच आहे. आपल्या सेवाकार्याचा लोकांना माहित होणं इथपर्यंत प्रचार करणं गरजेचे आहे. त्यांचा फार बागुलबुवा करु नका, एकच आँक्सिजन सिलेंडर आहे. त्यांच्या चार कार्यक्रर्ते फोटो काढून सोशल मीडियावर पाठवत आहे, असं करु नका अशाने आपल्याबाबत लोकांचे मत वाईट होईल.  
Edited by : Mangesh Mahale