Amit Deshmukh
Amit Deshmukh

वेतनासाठी महिला कामगार मंत्री अमित देशमुखांसमोर रडल्या....

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी चंद्रपुरात आलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना डेरा आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. नियोजन भवनात देशमुख यांची पत्रपरिषद सुरू असताना आंदोलक महिलांनी गोंधळ घातला.

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी चंद्रपुरात आलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना डेरा आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. नियोजन भवनात देशमुख यांची पत्रपरिषद सुरू असताना आंदोलक महिलांनी गोंधळ घातला. भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ठिय्या दिला. त्यांना हटविण्यासाठी दंगा नियंत्रक पथक बोलवावे लागले. त्यामुळे येथे प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली. देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या वाहनांचा ताफा थांबविण्याचा आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत धक्काबुक्की झाली.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुमारे पाचशे कंत्राटी कामगारांचे वेतन मागील सात महिन्यांपासून थकीत आहे. या वेतनासाठी मागील तीन महिन्यांपासून कामगारांनी डेरा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या वेतनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनस्तरावर बैठकांचा पाऊस पडला. परंतु आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, देशमुख मंगळवारी (ता. 27) चंद्रपुरात आढावा बैठकीसाठी आले. ते आंदोलनस्थळी भेट देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतच हंगामा केला.

यावेळी महिलांनी देशमुख यांना धारेवर धरेल. आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना महिला कामगार थकीत वेतनासाठी ढसाढसा रडायला लागल्या. त्यावेळी देशमुख, पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि उपस्थित आमदारांनी सभागृहातून पलायन केले. ते बाहेर निघताच प्रवेशद्वारावर उपस्थितीत आंदोलकांनी घेराव घातला. त्यांचा वाहनासमोर लोटांगण घातले. प्रचंड घोषणाबाजीने एकच गोंधळ निर्माण झाला. दंगा नियंत्रक पथक येताच वातावरण आणखी चिघळले. पोलिस बंदोबस्तात मंत्र्यांना त्या परिसरातून बाहेर पडावे लागले. त्यानंतरसुद्धा आंदोलक बराच वेळ तिथे ठिय्या देवून होते. जनविकास संघटनेचे पप्पू देशमुख यांना आधीच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना "गो बॅक'चा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. त्याउपरही आंदोलक महिला देशमुख यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com