गडकरी- फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?

सोमवारपासून अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिडाल. कारण सोमवारपासून अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार असल्याच्या इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी दिला.
Vijay waddettiwar
Vijay waddettiwar

भंडारा : सोमवारपासून अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिड़ाल. कारण सोमवारपासून अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिस कठोर कारवाई करणार असल्याच्या इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी दिला. ते आज भंडारा येथे कोविड 19 बैठकीत बोलत होते. नागरिकांनी घाबरू होऊ नये, म्हणून सरकार नरमाईने वागत होते. मात्र लोक ऐकत नसल्याने यापुढे कठोर कारवाई करणार असल्याच्या इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजनची नितांत व वाढती गरज आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्याशी फोनवर चर्चा झाली. ऑक्सिजन पुरवठयासाठी लष्करी मदत मागण्यात आली. मात्र राज्यात कोरोनाची स्थिती बिकट आहे. नागरिकांना प्राणवायू हवा आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मात्र केंद्र शासनाकडून त्याला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांची स्थिती हाताबाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.  

यावेळी भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर कोरोना हाताळण्याबाबत टिका केल्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली आहेत का? असा सवाल करीत गडकरी आणि फडणवीस यांनी कोविड होस्पिटल बांधली, कांग्रेस कधी बंधणार यावर  वड्डेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना टोल लगावला असुन भाजप नेत्यांनी बंधलेली हॉस्पिटल आम्हला दिसत नाही, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com