शिक्षक व पदवीधरांचे हे चार आमदार हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत नसणार - four mlc seat from teachers and graduate constituency vacant | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षक व पदवीधरांचे हे चार आमदार हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत नसणार

नीलेश डोये
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

चा कार्यकाळ १९ जुलै २०२० ला संपला. त्यांच्या जागांसाठी निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे केंद्रीय आयोगाने निवडणूक घेतली नाही. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना विधान परिषदेत बसता येणार नाही.

नागपूर : राज्य विधीमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या पटलावर पद्‍वीधर आणि शिक्षकांचा आवाज फारसा गंजुणार नाही. या सभागृहातील एकूण चार सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. यापैकी दोन विदर्भातील आमदार असून हिवाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता नाही.

पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या माध्यमातून विधान परिषदेत प्रतिनिधी येतात. साधारणतःया क्षेत्राशी संबंधित प्रश्न, समस्या या प्रतिनिधी मांडाव्या, हा त्या मागचा उद्देश आहे. परंतु यंदा हिवाळी अधिवेशनात नागपूर विभागातील पदवीधर तर अमरावतील विभागातील शिक्षकांचे प्रतिनिधी नसेल. त्यामुळे त्यांच्या समस्याही प्रभावीपणे ऐकू येणार नाही. येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

नागपूर विभागातून पदवीधर मतदार संघातून अनिल सोले तर अमरावती विभागातून शिक्षक मतदार संघातून श्रीकांत देशपांडे सदस्य होते. त्याचप्रमाणे दत्तात्रय सावंत हे पुणे विभागातील शिक्षक मतदार तर सतीश चव्हाण औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघातील विधान परिषद सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ १९ जुलै २०२० ला संपला. त्यांच्या जागांसाठी निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे केंद्रीय आयोगाने निवडणूक घेतली नाही. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना विधान परिषदेत बसता येणार नाही.

महिन्याभारत निवडणुका अशक्य
पदवीधर मतदारांची अद्याप यादीच अंतिम झाली नाही. ही यादी अंतीम झाल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. याला बराच काळ लागेल. त्यामळे अधिवेशनापूर्वी निवडणूक होणे शक्य नसल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख