अनिल देशमुखांसमोरील अडचणींत भर; निकटवर्तीयाला ईडीने घेतले ताब्यात

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता १६ जुलैला जप्त केली आहे होती.
 Anil Deshmukh .jpg
Anil Deshmukh .jpg

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला. नागपूरमधील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने आज तपासणी केली. या ठिकाणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यामुळे देखमुख यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (ED raids Anil Deshmukh's residence at Katol) 

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता १६ जुलैला जप्त केली आहे होती. त्यानंतर त्यांनी हा छापा टाकला आहे. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्या एका निकटवर्तीयाला ताब्यात घेतले असल्याची माहीती आहे.   

ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांचे मुळगाव असलेल्या वडविहिरा येथे छापा टाकला. तसेच त्यांच्या काटोल येथील घराची देखील झाडाझडती घेतली. त्यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप करत घोषणा बाजी केली.  

दरम्यान, या आधी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचे संजीव पलांडे यांनी सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला होता. या आधी देशमुख यांच्या नागपूर व वरळी येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली होती. 

देशमुख यांचे वकिल कमलेश घुमरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात घुमरे म्हणाले होते की आतापर्यंत देशमुख, त्यांचा मुलगा ह्‌षीकेश, पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स आलेले आहे. पण, त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना अद्याप तरी समन्स आलेले नाही. आरती देशमुखांना आजच्या तारखेसाठी समन्स आले होते, असेही अ‍ॅड. घुमरे यांनी या वेळी सांगितले होते.

सचिन वाझे याने चौकशी समितीला काही ठोस उत्तरे दिलेले नाहीत. फक्त एकदा जानेवारीत अनिल देशमुख यांना भेटल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे सचिन वाझे याने केलेले आरोप खोटे आहेत. सचिन वाझे याला बारवाल्यांनी 4 कोटी रुपये दिले आहेत. मात्र, ते पैसे अनिल देशमुख यांना दिले का? मग, त्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह काय करत होते? परमवीर सिंह यांनी केलेले आरोपही सर्रास खोटे आहेत, असा दावा देशमुखांचे वकिल घुमरे यांनी केला होता.     

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com