नागपुरात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई विरोधात एक रॅली काढली होती.
 Dispute between BJP-Congress workers in Nagpur .jpg
Dispute between BJP-Congress workers in Nagpur .jpg

नागपूर : नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोर्चा रोखण्याचा भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाल्याने, वादावादी ठिंगी पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. (Dispute between BJP-Congress workers in Nagpur) 

काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई विरोधात एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीला विरोध दर्शवला आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले. त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. 

तर, परिस्थितीची गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी जादा कुमकही मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावे लागले.

हेही वाचा 

चंद्रपूर महानगर पालिकेत टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरी...
 
चंद्रपूर : राज्यात सध्या सर्वाधिक चर्चा जर कोणत्या महानगरपालिकेची असेल, तर ती चंद्रपूरची. येथील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. परवा परवा शिव्याशाप आणि हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारीही झाल्या आणि आज शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर राखी कंचर्लावार Meyor Rakhi Kancharlawar आणि आयुक्त राजेश मोहिते Commissioner Rajesh Mohite यांना बरखास्त करण्याची मागणी केली. 

प्रत्येक कामांत टक्केवारी, भागीदारी आणि काम मिळविण्यासाठी दादागिरी, अशी नवी प्रथा मनपातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. या भ्रष्ट कारभारात अधिकारीसुद्धा सामील आहेत. शहरवासींच्या कराचा अशा पद्धतीने दुरुपयोग होत आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे राज्यात महानगर पालिकेची बदनामी होत आहे. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांना बरखास्त करून पालिकेवर प्रशासक बसविण्यात यावा, अशी मागणी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com