नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज ते अमरावतीत आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी अमरावतीहून परत येताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
अमरावती येथील कार्यक्रम संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपुरात परत येत असताना, शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कारकर्त्यांकडून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी रस्त्यावर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. अजित पवारांनी गाडी थांबवून आमची मागणी मान्य करावी, पवारांनी वाढीव वीज बिलासंदर्भातील निवदेन मान्य करावं, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
राज्यात वाढीव वीजबिलासंदर्भात वातावरण चांगलंच तापलं आहे. वीजबिल माफ करू, असं आश्वासन ऊर्जामंत्री यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी घुमजाव केलं, असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर वाडी परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
हे ही वाचा...
अजितदादा व बच्चू कडुंमध्ये बैठकीत झाला वाद
अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री आमदार यांची बैठक घेण्यात आली यावेळी निधीच्या मागणी वरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.
हे ही वाचा...
अमित शहांच्या कार्यक्रमात दोन गुंड स्टेजवर
भाजप नेत्यांच्या मुलीने मानले आदित्य ठाकरेंचे आभार
मात्र अजित पवार यांनी अकोला जिल्हाला थोडा निधी वाढून दिला त्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मिळालेल्या निधी वरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमरावती विभागाची आढावा बैठक आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत लोकप्रतिनिधीची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्हाला 300 कोटीची तरतूद करण्यात आली. त्याच प्रमाणे यवतमाळ 325 कोटी,बुलढाणा 295,वाशिम 185 तर अकोला साठी 185 कोटीचा निधी देण्यात आला
मात्र या निधीवर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली,मी सरकार मध्ये आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही,विदर्भाचा अनुशेष भरून निघावा या करिता आपण अधिक निधीची मागणी केली होती मात्र निधी वाढून देण्यात आला नाही,पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

