धक्कादायक : शेतात सापडले ५४ जीवंत काडतूस अन् ४७ रायफल  

अजून किती शस्त्र साठा लपवून ठेवला आहे, हे चौकशी नंतरच निष्पन्न होणार आहे.
Sarkarnama (9).jpg
Sarkarnama (9).jpg

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातिल चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत परसोडी जंगल शिवारालगतच्या शेतात जवळपास 54 जीवंत काडतूस तसेच एके 47 रायफल  पोलिसांनी जप्त केल्याची विश्वसनीय माहिती आहे. नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करण्याचा गोरखधंदा पोलिसांना उजेडात आणल्यानंतर आता शेतशिवारात पुरवून ठेवलेल्या काडतूस हस्तगत केल्याने जिल्ह्यात अजून किती शस्त्र साठा लपवून ठेवला आहे, हे चौकशी नंतरच निष्पन्न होणार आहे. 

काही महिन्यापूर्वी गोंदिया  लगतच्या बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा होत असल्याचा नावावर गोंदिया जिल्ह्यातील 7 आरोपींना बालाघाट पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यातील दोन आरोपींनी कसून चौकशी केली असता, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातिल चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत परसोडी जंगल शिवारालगतच्या शेतात जवळपास 54 जीवंत काडतूस तसेच एके 47 रायफल  पोलिसांनी जप्त केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

शिवसेनेला झुकते माप ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून दुजाभाव नाही 
नक्षल्यांचा रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसर ओळखला जातो. असे असले तरी, नक्षल्यांच्या कारवाया जिल्ह्यात होत राहतात, त्यातच शहरातील एका माजी नगरसेवकासह चिचगडचे दोन असे एकूण 7 आरोपींना नक्षल्यांना शस्त्रसाठा पुरविण्यात असल्याच्या कारणावरून अटक केली होती. दरम्यान हे  सर्व आरोपी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातच आरोपींची चौकशी सुरू असून चिचगड येथील दोन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्या आरोपींनी लपवून ठेवलेले जीवंत काडतूस  पोलिसांनी चिचगड परिसरातील शेतशिवारातून हस्तगत केल्याची माहिती प्राप्त आहे. 

आमदारांनी EVM हॅक केल्याचा व्हिडीओ  व्हायरल ; शिवसेना-भाजप आमने-सामने 
कल्याण : ईव्हीएम हॅक  EVM करूनभाजपचे आमदार गणपत गायकवाड Ganpat Gaikwad हे निवडून आल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कल्याण मधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावाही करण्यात आला असला तरी हा जाणूनबाजूनं केल्याची चर्चा आहे.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com