एकनाथ शिंदे चांगले नेते, पण मागणी वडेट्टीवारांनाच

जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दहा हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे पेंदोरकर यांनी सांगितले आहे.
Gadchiroli People Wants Vijay Vadettiwar as Guardina Minister Instead of Ekanath Shinde
Gadchiroli People Wants Vijay Vadettiwar as Guardina Minister Instead of Ekanath Shinde

गडचिरोली  : राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेली गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक मान्यवरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण एकनाथ शिंदे चांगले नेते असले, तरी विजय वडेट्टीवारांसारखा स्थानिक नेताच पालकमंत्री हवा, अशी भावना व्यक्त करत आहेत.

जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दहा हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे पेंदोरकर यांनी सांगितले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडे आधी चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.  तर गडचिरोलीचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोरोनाच्या संकटात काही काळासाठी विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याबाबत कोणताही दुजाभाव केला नाही. मागील तीन.-चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी  सांभाळली. 

त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर वनजमीन मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी खत कमी पडू नये म्हणून आधीच उपयोजना केली. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्‍के लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच शासनाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली आहे. 

अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत महाज्योती नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अतिदुर्गम भागांत रस्ते, पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून दिला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जनता कर्फ्यू असताना अनेक गरीब नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यामुळे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे असल्यास जिल्हा विकासाला वेग येईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अल्पकालीन पालकमंत्रिपदाच्या काळात विकासकामांचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यांनी अल्पावधीत केलेली वेगवान विकासकामे बघता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जर पूर्णवेळ त्यांच्याकडे राहिले, तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार फार वेळ लागणार नाही, - दीपक आत्राम, माजी आमदार, अहेरी

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले, याबद्दल आम्हाला नाराजी नाही. पण, या पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांना मुंबई मंत्रालयातूनच अधिक वेळ काम पहावे लागले. विजय वडेट्टीवार जिल्ह्याला नेहमी भेटी देऊन विकासकामांना गती देत होते. म्हणून पालकमंत्रिपद वडेट्टीवार यांच्याकडे असल्यास विकासचक्र सुलभतेने गतिमान होईल. - अजय कंकडालवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com