Breaking - संजय राठोड मंत्रीपदाबरोबरच आमदारकीचाही राजीनामा देणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता राठोड यांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून उभे झालेले वादळ आणि कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता आता पायउतार व्हा, असे त्यांना सांगण्यात आले आहे
Sanjay Rathod
Sanjay Rathod

वाशिम : पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे येणार असून ते आपल्या मंत्री पदाचा सोबतच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता राठोड यांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून उभे झालेले वादळ आणि कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता आता पायउतार व्हा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.  दरम्यान, टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्यांच्यावर संशय घेतला जात आहे ते वन राज्यमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा अटळ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटवरुन दिसून येते आहे. सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन....असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले आहे.

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सूई वळली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधात असलेल्या भाजप आक्रमक झाला आहे. राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही आहे. राठोड यांच्याबाबत पुढे काय याबद्दल अद्याप मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही. राठोड यांनी गेले काही दिवस सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटायचा प्रयत्न केला. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या भेटीशिवाय उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com