आम्ही ऑर्केस्ट्रा नेहमी मागे बसून पाहायचो; कारण...

तो आनंद वेगळा होता.
Nitin Gadkari told event of school life
Nitin Gadkari told event of school life

नागपूर : ‘‘आम्ही सिनेमा मागून आणि नाटक समोरून पाहणाऱ्या वर्गातील होतो. आम्ही ८५ पैशांत थर्ड क्लास तिकिट काढायचो आणि आरडाओरडा करायचो. ऑर्केस्ट्रा नेहमी मागे बसून पाहायचो. कारण, तो पाहण्यासाठी आमच्याकडे तेव्हा पैसेच नसायचे,’ असा शालेय जीवनातील किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात सांगितला. (Nitin Gadkari told event of school life)

शिक्षकदिनानिमित नागपूरमधील साऊथ पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात गडकरी बोलत होते. या वेळी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, नागपूरमधील काही थिएटरमध्ये आमचे काही मित्र होते. ‘आदमी आणि इन्सान’ या चित्रपटाचे थर्ड क्लासचे एक रुपया पाच पैशांचं तिकिट काढायचे ठरवले होते. पंधरा फूट जमिनीला पाय न लागता आम्ही हवेतच तरंगत गेलो होते. तो आनंद वेगळा होता. त्या दिवसांतून शिकायला मिळाले. शैक्षणिक ताकद तुम्हाला संषर्घात टिकवून ठेवते. युद्धात हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही. पण, जो युद्धभूमीतून पळून जातो, हरतो. 

आम्ही चिटणीस पार्कमध्ये क्रिकेट खेळायचो. एक दिवस मी चिटणीस पार्कमधून बाहेर चेंडू मारायचे ठरवले होते आणि मी तो मारला होता. हे सर्व ध्येयाने प्रेरित झाल्यानंतर शक्य आहे, असाही सल्ला त्यांनी या वेळी बोलताना दिला.

...अन्‌ मी भाषण करायला शिकलो

मी ज्यावेळी शाळेत होतो, त्यावेळी स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता आणि मुलं-मुली भाषण देत होते. आम्ही तसं टवाळखोर मुलांमध्येच जास्त होतो. एक मुलगी भाषण करताना अडखळत होती. ती इंग्लिशमध्ये बोलत होती. ती ‘नेचर’ला ‘नट्रू’ म्हणाली आणि आम्ही तिची मजा करण्यासाठी मागून तिला चिडवत होतो. हे मुख्याध्यापकांनी पाहिले आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेऊन चांगलीच धुलाई केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे भाषण देण्याची, तुझ्यात तेही नाही. तरीही तू तिची थट्टा करतो. त्यांनी दिलेल्या मारामुळे माझ्या मनात निगेटिव्ह इच्छाशक्ती तयार झाली आणि ठरवलं की आपणही भाषण करून दाखवायचं. मी भाषण करायला सुरूवात केली. जर त्यावेळी मुख्याध्यापकांनी मला मारलं नसतं किंवा आपला अपमान झाला आहे, असं वाटलं नसतं तर कदाचित मी कधीच भाषण करायला सुरूवात केली नसती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com