मी उद्धव ठाकरेंचा माजी मित्र : सुधीर मुनगंटीवार - I am former friend of Uddhav Thackeray Say Sudhir Mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

मी उद्धव ठाकरेंचा माजी मित्र : सुधीर मुनगंटीवार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन करत लोकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्र्यांचा माजी मित्र असा केला

चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन करत लोकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्र्यांचा माजी मित्र असा केला. आज भाजपच्या वतीने चंद्रपुरात वीज बिलांची होळी करण्यात आली आणि यावेळी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे आवाहन केले. 

महाविकास आघाडी सरकारकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर, गाड्यांवर खर्च करायला पैसा आहे, पण गरिबांचे वीज बिल माफ करायला पैसा नाही. सरकारने गरिबांचे वीज बिल माफ करावे आणि त्याचे श्रेय घ्यावे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

विविध ठिकाणी आंदोलन
बुलडाणा : राज्यात सर्वत्र वाढीव विजबिले देण्यात आल्याने सर्व नागरिक हैराण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतातील रब्बी ची पिके सकत चालले आहेत अश्या वाढीव विज बिले तात्काळ माफ करण्यात यावी या मुख्य मागणी साठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाीज वितरण कार्यलयात वाढीव विजबिलाची होळी करीत आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे .
यावेळी माजीआमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

परभणी : उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वीजबीला संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून परभणीत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे,परभणी एमएसईबीच्या कार्यालया समोर वाढीव वीजबिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले.

जालना : रोना काळात आलेल्या घरगुती आणि वीज पंपाच्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात आज जालन्यातील महावितरण कार्यालयासमोर भाजपनं बिलांची होळी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यानी वीजबिल माफ करण्याची मागणी करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.आज भाजपकडून महावितरणच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आलं

नवी मुंबई : कोरोना काळात महावितरण कडून सरासरी वीजबिल देऊन ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड दिला आहे.आणि या वीज बिलाच्या वसुली करिता जर ग्राहकांचे वीज मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते विरोध करून पुन्हा रस्त्याच्या उतरतील असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज खारघर येथे वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख