रुग्णालय म्हणते... म्हणून आम्ही तन्मय फडणवीसला लस दिली - An explanation was given by the hospital that vaccinated Tanmay Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णालय म्हणते... म्हणून आम्ही तन्मय फडणवीसला लस दिली

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली, असा सवाल काँग्रेस आणि नेटकऱ्यांनी उपस्थित करीत फडणवीस यांना ट्रोल केले होते. 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. वाद झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली.

सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली, असा सवाल काँग्रेस आणि नेटकऱ्यांनी उपस्थित करीत फडणवीस यांना ट्रोल केले होते. 

त्यातच आता तन्मय फडणवीस यांना कोरोना लस का देण्यात आली याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ''तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला'' असे रुग्णाल्याने म्हटले आहे.

राज्यात संपूर्ण लॅाकडाऊनच्या दिशेने; दुध, भाजीपाला, किराणा दुकाने सकाळी फक्त ४ तास खुली

 फडणवीस काय म्हणाले होते? 

त्यानंतर या प्रकरणावर फडणवीस यांनी लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये फडणवीस म्हणाले की ''तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली, असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे, असल्याचे फडणवीस म्हणाले.

धक्कादायक : बनावट आरटीपीसीआर द्वारे देत होते कोरोना अहवाल

''४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!,'' असे टि्वट काँग्रेसने केले होते. 
 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख