आम्हाला तुकाराम मुंढेच हवेत! काँग्रेसच्या नगरसेवकांचा नाना पटोलेंच्या समोरच गोंधळ - Congress corporator demands to bring Munde back to Nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

आम्हाला तुकाराम मुंढेच हवेत! काँग्रेसच्या नगरसेवकांचा नाना पटोलेंच्या समोरच गोंधळ

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

नागपुरातील कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत होते.

नागपूर : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असेही ते म्हणाले.

बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत यांना जाळून टाकू असी धमकी दिली. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा सगळा प्रकरा घडला. त्यावेळी नाना पटोले यांनी बंटी शेळके यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

परमबीरसिंग यांच्या वतीने कझिन ने दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती...: पोलिस निरीक्षकाचा आरोप

नागपुरातील कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे मुंढे यांच्या विरोधात जून २०२० मध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. माजी महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर टीका केली होती.

तुकाराम मुंढे यांची जानेवारी २०२० मध्ये नागपुरच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. नगरसेवकांशी वाद झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांची नागपुरमधून केवळ ७ महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

चक्क एसपींच्या नावाने फेसबूक अकाऊंट; मित्रांकडे पैशांची मागणी

मुंढेंची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी नागपूर करांना त्यांच्या निवास्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देत, मुंढे यांचे स्वागत केले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख