आजचा वाढदिवस - नाना पटोले, अध्यक्ष विधानसभा - Today's Birthday Nana Patole Chairman Maharashtra Vidhansabha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस - नाना पटोले, अध्यक्ष विधानसभा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 जून 2020

आक्रमक, बहुआयामी, ओबीसी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा प्रवास आहे. त्यांचा आज (५ जून) वाढदिवस आहे

क्रमक, बहुआयामी, ओबीसी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा प्रवास आहे. ५ जून १९६३ रोजी साकोली तालुक्यातील सुकळी येथे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते परिसरात नानाभाऊ म्हणून ओळखले जात. १९९० मध्ये विद्यार्थी दशेतच त्यांनी सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले व त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 

१९९९ व २००४ मध्ये त्यांना काँग्रेसकडून लाखांदूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाली. पण नंतर नंतर ते भाजपमध्ये गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी भाजपकडून लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल या  दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. 

नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. मोदी सरकारवरही त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. सरकारवर टिका करत खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार ठरले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण त्यात ते पराभूत झाले. नंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांनी भाजपचे डाॅ. परिणय फुके यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर म्हणून नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती. त्यातून त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस कुठे दिसत नाही, या टिकेला उत्तर दिले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता अशी नाना पटोले यांची ओळख आहे. नाना पटोले यांची कार्यशैली आक्रमक आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख