आश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी 

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या निर्णयानुसार आश्रमशाळातील आठवी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार (ता.२) पासून सुरु करण्यात येत आहेत.
आश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी 
Ashram School

नाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ (Schools are closed from Dec. 2020 under Mission begin again) अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. (Those school was closed again in covid19 second wave) आता आदिवासी विकास विभागाच्या निर्णयानुसार आश्रमशाळातील आठवी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार (ता.२) पासून सुरु करण्यात येत आहेत,(8th to 12th classes reopen again) असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय सांगितले. 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या सुचनेनुसार आदिवासी विकास विभागाने शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत. 

आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार  आश्रमशाळा निवासी असल्याने पाल्याला शाळेत व वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. 

शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आणि संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे या बाबत देखील सूचना  देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षिक-अधीक्षिका आणि गृहपाल यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार व जिल्हा प्रशासनाच्या कोविड-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत.

शाळा सुरु करताना ज्या ग्रामीण भागात किमान एक महिना आधी कोविड रुग्ण आढळलेला नाही अशा ग्रामपंचायत आणि तेथील पालकांशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरु करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या शाळा सुरु करण्यापूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतले असणे आवश्यक आहे.  
संपूर्ण आश्रमशाळा व वसतिगृहाचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात येवून त्याठीकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था व निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावणे असेही श्री. सोनवणे यांनी सूचित केले आहे.
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in