इन्कम टॅक्स भरत असतानाही किसान सन्मान योजनेचा लाभ; शेतकऱ्यांकडून 47 लाखांची वसुली

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या व आयकर भरणाऱ्या तब्बल चार हजार ६४६ शेतकऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
 Recovery of Rs 47 lakh from farmers .jpg
Recovery of Rs 47 lakh from farmers .jpg

यवतमाळ : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या व आयकर भरणाऱ्या तब्बल चार हजार ६४६ शेतकऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे. यातील काही शेतकऱ्यांकडून ४७ लाखांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. अजूनही जवळपास साडेतीन कोटी रुपये वसुली थकीत आहे. 

केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्‍टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रति हप्ता दोन हजार रुपये मिळता. असे एकून तीन हप्ते ६ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. हा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती अपलोड केली होती.

मात्र, लाभ घेण्याच्या दृष्टीने मोठ्‌या प्रमाणात आयकर, सरकारी अधिकारी, कर्मचारी, पेन्शनधारक, दोन हेक्‍टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी माहिती भरली होती. विशेष म्हणजे या माहितीच्या आधारावर संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. 

मात्र, अशा शेतकऱ्यांकडून शासनाने वसुली सुरू केली. गेल्या महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यात तब्बल चार हजार ६४६ शेतकरी आयकर रिटर्न असून त्यांच्या खात्यात तब्बल चार कोटी १८ लाख रुपयांचा निधी टाकण्यात आल्याची माहिती आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. घेतलेली रक्कम त्वरित भरावी, अशा सूचना देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने मोजक्‍याच शेतकऱ्यांनी ४७ लाखांहून अधिक रक्कम शासन जमा केली. परंतु उर्वरित शेतकरी उचल केलेला हप्ता परत देण्यास तयार नाही. त्यामुळे संबंधित आयटी रिटर्न शेतकऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केल्या जाण्याची शक्‍यता आहे. शेतकरी सन्मान निधीची मिळालेली रक्कम अपात्र व्यक्तीने परत न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे नियम २६७ अंतर्गत वसुलीची कारवाई केली जाते. भरीस भर खोटी माहिती दिल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई सुद्धा करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.
 
कोरोनाने लागला ब्रेक

आयकर भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांचेकडून रक्कम वसूल करण्यात येत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. परिणामी, वसुलीची गती मंदावली आहे. गेल्या काही दिवसापासून तर संसर्गाची गती अधिक वाढली असून प्रशासन ही गती कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  
 Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com