नागपूर : बॅंक सखीच्या नियुक्तीत अनियमितता केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (सीईओ) अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता, हलगर्जीपणा करणारे अधिकारी, कर्मचारी सीईओंच्या रडावर आहेत.
झिरो पेंडेंसीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभेजकर यांनी विशेष योजनी आखली. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरण समोर येत आहे. त्याचसोबत कामाला गती येत असल्याचे कर्मचारी सांगतात. फाईल प्रलंबित ठेवल्याप्रकरणी आतापर्यंत सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. एकला सक्त ताकिद देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. सीईओंच्या निर्णयाचे काहींकडून स्वागत होत आहे तर काहींमध्ये नाराजीचा सूर आहे.
एका विस्तार अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश त्यांनी दिले. मिळालेल्या माहितीनुसार बॅंक सखीच्या नियुक्तीत त्यांनी अनियमितता केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध योजना राबिल्या जातात. महिलांचे बचत गट व बॅंकांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बॅंक सखीची नियुक्ती केल्या जाते. बॅंक सखी बॅंक व महिला बचत गटांमध्ये दुवा म्हणून सुद्धा काम करते. या बॅंक सखींना मानधन सुद्धा देण्यात येते. प्रक्रियेमार्फत यांची निवड करण्यात येते. या बॅंक सखीची निवड करताना चव्हाण नामक विस्तार अधिकाऱ्यांनी नियमितता केली. याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीईओ कुंभेजकर यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश दिले.
Edited By- Amit Golwalkar

