अजितदादा व बच्चू कडुंमध्ये बैठकीत झाला वाद - Heated Argument between Bacchu Kadu and Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा व बच्चू कडुंमध्ये बैठकीत झाला वाद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री आमदार  यांची बैठक घेण्यात आली यावेळी निधीच्या मागणी वरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.

अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री आमदार  यांची बैठक घेण्यात आली यावेळी निधीच्या मागणी वरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.

मात्र अजित पवार यांनी अकोला जिल्हाला थोडा निधी वाढून दिला त्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मिळालेल्या निधी वरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमरावती विभागाची आढावा बैठक आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत लोकप्रतिनिधीची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्हाला 300 कोटीची तरतूद करण्यात आली. त्याच प्रमाणे यवतमाळ 325 कोटी,बुलढाणा 295,वाशिम 185 तर अकोला साठी 185 कोटीचा निधी देण्यात आला 

मात्र या निधीवर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली,मी सरकार मध्ये आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही,विदर्भाचा अनुशेष भरून निघावा या करिता आपण अधिक निधीची मागणी केली होती मात्र निधी वाढून देण्यात आला नाही,पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख