चंद्रपूरच्या वसंत भवनावरील उधळपट्टी स्थायीत गाजणार - Chandrapur Vasant Bhavan Issue will Surface in ZP Standing Committee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

चंद्रपूरच्या वसंत भवनावरील उधळपट्टी स्थायीत गाजणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यात यंदाचे बजेटही ६० कोटीवरून तीस कोटीवर आले. जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाचे स्रोत फार नाही. शहरातील एकमेव वसंत भवन आहे. मात्र, या भवनाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ तीस लाख उत्पन्न देणाऱ्या वसंत भवनावर ९० लाखांचा खर्च करण्यात आला.

चंद्रपूर :  जिल्हा परिषद मालकीच्या असलेल्या वसंत भवनावर गेल्या पाच वर्षांत तब्बल ९० लाखांचा खर्च करण्यात आला. हा खर्च खरोखर झाला की नाही याबाबत काही जिल्हा परिषद सदस्यांना शंका आहे. त्यामुळे त्यांनी मागील स्थायी समितीत वसंत भवनाची संपूर्ण माहिती मागिवली. येत्या मंगळवारी (ता. ८) स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेत वसंत भवनावरील उधळपट्टी समोर येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यात यंदाचे बजेटही ६० कोटीवरून तीस कोटीवर आले. जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाचे स्रोत फार नाही. शहरातील एकमेव वसंत भवन आहे. मात्र, या भवनाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ तीस लाख उत्पन्न देणाऱ्या वसंत भवनावर ९० लाखांचा खर्च करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वसंत भवनावरील गाळ्यातील भाडेवाढीचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी उचलून धरला होता. 

मागील महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही त्याचे पडसाद उमटले. वसंत भवनातील गाळेधारकांचे करार २०१८ मध्ये संपुष्टात आले. त्यानंतर भाववाढ अपेक्षित होती. त्याला गाळेधारकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे गाळेधारक अनधिकृत राहत आहे. शासकीय नियमानुसार त्यांच्याकडून ४० टक्‍क्‍यांपर्यंत भाववाढ करण्याचा विचार समितीच्या सदस्यांचा आहे. मात्र, भाववाढ गाळेधारकांना मान्य नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला होता. 

गेल्या पाच वर्षांत वसंत भवनाच्या डागडुजीवर तब्बल ९० लाख रुपये खर्च करण्यात आले. उत्पन्न कमी असताना त्यावर झालेला खर्च बघता जिल्हा परिषद सदस्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्यामुळे ९० लाखांचा खर्च कुठे-कुठे झाला याची माहिती मागील सभेत मागविण्यात आली होती. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत ही माहिती सादर करण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख