भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना शहरप्रमुखाच्या ऑडिओ क्लिपची शाई वाळत नाही तोच नेहरूनगर झोन सभापती सविता चकोले यांचे पती राजेंद्र चकोले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एका कंत्राटदाराला ‘काम झाले हिशेब कधी करतो’, अशी विचारणा राजेंद्र चकोले यांनी केली आहे.व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
BJP Leaders Audio Clip went viral in Nagpur
BJP Leaders Audio Clip went viral in Nagpur

नागपूर : शिवसेना शहरप्रमुखाच्या ऑडिओ क्लिपची शाई वाळत नाही तोच नेहरूनगर झोन सभापती सविता चकोले यांचे पती राजेंद्र चकोले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एका कंत्राटदाराला ‘काम झाले हिशेब कधी करतो’, अशी विचारणा राजेंद्र चकोले यांनी केली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

नेहरूनगर झोन सभापती व प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपच्या नगरसेविका समिता चकोले यांचे पती राजेंद्र चकोले हे कंत्राटदार निलकंठ बेलखोडे यांना कमिशन मागत असल्याचे संवादातून स्पष्ट होते. मात्र, चकोले यांनी संबंधित ऑडिओमधील आवाज आपला नसल्याचा दावा करीत मोबाईल ठेवून दिला तर कंत्राटदार बेलखोडे यांनी क्लिपमधील संभाषण खरे असल्याचा दावा करीत चकोले यांनी मोबाईल करून विकासकामांचे कमीशन मागतिले व धमकावलेही, असा आरोप केला.

बेलखोडे म्हणाले, शेषनगर येथे एका सिमेंट रोडचे काम केले आहे. त्याचे बिल अद्याप मिळालेले नाही. चकोले हे त्या कामाचे कमीशन मागत आहे. बिल मिळवून देण्याची जबाबदारी नसल्याचे सांगत आहे, असे बेलखोडे यांनी सांगितले. यानिमित्त महापालिकेत नागरसेविकाऐवजी त्यांच्या पतीचीच लुडबुड अधिक असल्याचेही अधोरेखित झाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com