बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असल्याचे आपण पाहतो.आता तर चक्क राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एंट्री केल्याचं समोर आलं आहे.
Bacchu Kadu Playing Kabaddi in Amravati
Bacchu Kadu Playing Kabaddi in Amravati

अमरावती : राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असल्याचे आपण पाहतो.आता तर चक्क राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एंट्री केल्याचं समोर आलं आहे.

अमरावतीच्या चांदुर बाजार मध्ये गो सी टोम्पे महाविद्यालयात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उटघाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतःहा मैदान उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला. राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमी चर्चेत असतात. गावखेड्यात चालत असलेल्या खेळाशी बच्चू कडू यांची आजही नाळ कायम आहे.

कधी कुस्ती, कधी कबड्डी या खेळातून राज्यमंत्री बच्चू कडू हे मातीतील खेळाचे मैदान गाजवत असतात. आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांचा कबड्डी खेळाचा संघ होता. आपल्याला असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. अशाच प्रकारे चांदुर बाजार मधील एका महाविद्यालयात कबड्डी सामन्याच्या उटघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले बच्चू कडू चक्क खेळाडूच्या भूमिकेत दिसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com