राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्या आपल्या 'गृहमंत्र्यां'ना वाढदिवसाच्या शुभेच्छा - Anil Deshmukh Gives Birthday Wishes to wife Through Twitter | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्या आपल्या 'गृहमंत्र्यां'ना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

माझ्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांना काय हवं-नको ते पाहणं, घरी सुना-नातवंडांना आधार देणं ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सौ. ने ती अगदी लिलया पार पाडली. आणखी एक गोष्ट मी कधीही विसरु शकत नाही, ती म्हणजे कोरोनाच्या काळात गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी मी, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री व माझे इतर सर्व सहकारी ठाम उभे होतो. या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला चोवीस तास घराबाहेर असलेल्या आपल्या पतीची काळजी होती. अशा काळात त्यांच्याशी बोलून त्यांना धीर देण्याचं म्हणलं तर डोंगरएवढं काम माझ्या सौ. ने केलं असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे : राज्याचा गृहमंत्री पदाची जबाबदारी पार पाडत असताना यात मोठा वाटा आहे माझ्या 'होम मिनिस्टर' अर्थात माझ्या सौ.चा. त्या घरची जबाबदारी चोख पार पाडत असल्यामुळेच मला राज्यात काम करण्याची मोकळीक मिळतेय. या कर्तव्यदक्ष 'होम मिनिस्टर'ला आज वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! असे ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नी  सौ. आरती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसं पाहिलं तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसांतच कोरोना महामारीने हातपाय पसरले. पाठोपाठ लॉक डाऊन सुरू झालं आणि त्यामुळं पोलिसांवर प्रचंड ताण आला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी मला राज्यभर दौरे करावे लागले कित्येक दिवस घरी जाता येत नव्हतं. दुसरीकडे कोरोनाचीही चिंता होती. अशा कठीण काळात सौ.ने घरची आघाडी खंबीरपणे सांभाळली. तसा यापूर्वीही सौ च्या क्षमतेचा अनुभव असल्याने मलाही निर्धास्तपणे काम करता आलं, पोलिसांच्या पाठीशी उभं राहता आलं,'' असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये देशमुख पुढे म्हणतात, ''माझ्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांना काय हवं-नको ते पाहणं, घरी सुना-नातवंडांना आधार देणं ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सौ. ने ती अगदी लिलया पार पाडली. आणखी एक गोष्ट मी कधीही विसरु शकत नाही, ती म्हणजे कोरोनाच्या काळात गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी मी, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री व माझे इतर सर्व सहकारी ठाम उभे होतो. या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला चोवीस तास घराबाहेर असलेल्या आपल्या पतीची काळजी होती. अशा काळात त्यांच्याशी बोलून त्यांना धीर देण्याचं म्हणलं तर डोंगरएवढं काम माझ्या सौ. ने केलं हे वाढदिवसाच्या निमित्त आज सांगताना मला मनोमन अभिमान वाटतो. माझ्या 'होम मिनिस्टर'ला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जनसेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना,''
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख