पोलीस निरीक्षकाकडूनच सहकारी महिलेवर बलात्कार अन् मारहाण

वाशिम येथे ही घटना घडली असून विश्वकांत गुट्टे असे आरोपी पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
Rape of a female police officer by a police inspector
Rape of a female police officer by a police inspector

वाशिम : नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचे समोर आलं आहे. एका पोलीस निरीक्षकाने जबरदस्तीने घरात घुसून महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मारहाण केल्याचेही स्पष्ट झालं आहे. (Rape of a female police officer by a police inspector)

वाशिम येथे ही घटना घडली असून विश्वकांत गुट्टे असे आरोपी पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर वाशिम शहर पोलीस ठाण्यांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला पोलीस कमर्चारी वाशिम येथे स्थानिक गुन्हे शाखेत तर गुट्टे हा नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. हा प्रकार समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

गुट्टे हा 2007 मध्ये मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता. त्यावेळी पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याशी त्याची ओळख झाली होती. त्यानंतर ही ओळख वाढत  गेली. या ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी गुट्टे हा पीडित महिलेच्या घरी आला होता. त्यानंतर त्याने मारहाण करत महिलेवर बलात्कार केला. या प्रकारानंतर संबंधित महिला सहायक पोलिस निरीक्षक अलका गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com