अत्वृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा! - prepare inquest in heavy rain afected area; Amravati politics | Politics Marathi News - Sarkarnama

अत्वृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा अशा सूचना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिल्या आहेत. 
 

अमरावती : रविवारी दुपारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Heavy rains in Amaravati district on Sunday) यात भातकुली, दर्यापूर, चांदुर बाजार तालुक्यात अक्षरशः ढगफुटी झाली. (literally cloudburst in Daryapur and Chandur bazar Area) शिराळा, पुसदा, थिलोरी गावात पाणी शिरलं. अमरावती, चांदूर बाजार मार्गाची वाहतूक देखील थांबली होती. यामुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा अशा सूचना पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिल्या आहेत. 

याबाबत प्रशासनास तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी तुबल्याने पिके पाण्याखाली आली होती. दरम्यान खारतळेगाव येथील  दोन युवक वाहून गेले होते. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला. प्रशासनाला तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेत.

या संदर्भात मुख्यमंत्री व पुनर्वसनमंत्री यांचेशी चर्चा देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. सोबतच पिकविमा कंपनीशी पालकमंत्री बोलल्या.  शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन एकाही नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सोडणार नाही. शासन स्तरावर योग्य ती मदत देखील दिली जाणार असल्याच मत पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केले. यासह  पालकमंत्री स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...

हेही वाचा...

आदिवासी विकास खाते माझ्याकडेच राहील!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख