टोळधाड नियंत्रणासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा 

मध्य प्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ही टोळधाड आली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोळधाडीमुळे शेतपिकांचे, भाजीपाला, फळबागा आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
Drones will spray pesticides for locust control
Drones will spray pesticides for locust control

मुंबई : मध्य प्रदेशातून नागपूर व अमरावती विभागात आलेल्या टोळधाडीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनच्या साह्याने कीटकनाशक फवारणी शक्‍य असल्यामुळे टोळधाडीच्या निर्मुलनासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती. त्यानुसार नागपूरच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डन येथे ड्रोनच्या प्रात्यक्षिकांची कृषिमंत्री भुसे पाहणी यांनी केली. 

या ठिकाणी एअरोनिका कंपनीच्या दोन ड्रोनचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. ड्रोनची क्षमता 10 लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन फवारणी करण्याची आहे. क्‍लोरोपायरोफॉस हे कीटकनाशक त्यासाठी वापरण्यात येत आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, कृषी सहसंचालक डॉ. रवींद्र भोसले या वेळी उपस्थित होते. 

मध्य प्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ही टोळधाड आली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोळधाडीमुळे शेतपिकांचे, भाजीपाला, फळबागा आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. नंतर ही टोळधाड पुन्हा मध्य प्रदेशातील जंगलात निघून गेली होती. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात दाखल होऊ शकते. शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडीवर कीटकनाशकांची फवारणी हाच एकमेव उपाय असल्यामुळे ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नागपूर, अमरावती या विभागात टोळीधाडचे प्रमाण मोठे होते, त्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झाले होते. 

विविध निरीक्षणांची नोंद सुरू 

टोळधाडीच्या आक्रमणासंबंधी कीटकशास्त्र विभागाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कृषी विभागाचे अधिकारी, तसेच कीटकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, प्राध्यापक विविध निरीक्षणे नोंदवित आहेत. त्यामध्ये टोळधाडीचे आक्रमण, त्यांचा फळपिके, भाजीपाला नष्ट करण्याचा कालावधी, आक्रमणादरम्यान अंडी घालणे किंवा प्रजननाची लक्षणे यांचा समावेश असल्याचेही कृषिमंत्री दादा भुसे यांनी या वेळी सांगितले. 

एअरोनिका कंपनीचे ड्रोन 10 लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन 10 मीटर उंचापर्यंत उड्डाण करून 15 मिनिटांपर्यंत फवारणी करू शकते. तसेच, एका तासामध्ये 10 एकर परिसर फवारणीची क्षमता आहे. ड्रोनला स्वयंचलित केल्यास एका तासात दोन एकर क्षेत्रावर फवारणी करणे शक्‍य आहे. 
- जीवन कुमरे, 
एअरोनिका ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलाजी

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com