पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य : प्रफुल्ल पटेल  - Chief Minister agrees to give bonus to paddy growers in East Vidarbha: Praful Patel | Politics Marathi News - Sarkarnama

पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य : प्रफुल्ल पटेल 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

भंडारा : मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. कोरोनाच्या संकटाशी सामना करताना महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात सापडले आहे. सरकारने कोरोनाचा प्रसार आणि प्रदूर्भाव थांबविण्यात खर्च करीत आहे. 

गेल्या वर्षी राज्य सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला ती रकक्म मिळाली सुद्धा आहे. खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. यावर्षी सुद्धा राज्य सरकारने 1400 कोटी रुपयांचा बोजा शासकीय तिजोरीवर पडणार असला तरी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे मान्य केले आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणूक जवळ येत असून महाराष्ट्रात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार नसल्याचं मत या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित लेख