रडारवरील पोलिसांच्या नेत्यांपुढे पायघड्या; निलंबनाची धास्ती

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिस्तीच्या खात्यात बेशिस्त असणाऱ्यांविरुद्घ निलंबनाचे हत्यार उपसले आहे. कारवाई टाळण्यासाठी रडारवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी आता राजकीय नेत्यांपुढे पायघड्या टाकायला सुरुवात केली आहे.
Police
Police

यवतमाळ : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिस्तीच्या खात्यात बेशिस्त असणाऱ्यांविरुद्घ निलंबनाचे हत्यार उपसले आहे. कारवाई टाळण्यासाठी रडारवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी आता राजकीय नेत्यांपुढे पायघड्या टाकायला सुरुवात केली आहे.

मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. आपले वरिष्ठांशी सख्य आहे. त्यामुळे आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, असा त्यांचा तोरा असतो. दोन महिन्यांपूर्वी रूजू झालेले पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी क्रीम जागांवर असलेल्यांची नशा उतरवायला सुरुवात केली आहे. अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांची कुंडलीच पोलिस अधीक्षकांच्या हाती लागली आहे. अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असतानादेखील पोलिस खात्यामधीलच काही कर्मचारी सुरुंग लावीत असल्याचे बघून जिल्हा पोलिस अधीक्षक अधिकच आक्रमक झालेले आहेत. 

अशा कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची रणनीती एसपींनी आखली आहे. 'त्या' नावांची चर्चा पोलिस वर्तुळात होताच आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी रडारवरील कर्मचाऱ्यांनी नेत्यांपुढे पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. राजकीय वर्तुळात आपले मोठे वजन आहे, हे सांगण्यास नेते विसरत नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक केवळ कर्तव्याला प्राधान्य देत असल्याने पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.

ठाणेदारांचा कारवाईवर भर
आपल्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आतापर्यंत ठाणेदारांनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. एसपींच्या अधिनष्ठ असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापेमारी करीत गुन्ह्यांचा पर्दाफास केला. त्यामुळे ठाणेदारांचा चेहराही पुढे आला. आता पथकांचा छापा पडून कारवाईच्या कचाट्यात सापडण्याऐवजी ठाणेदारांनीच छापेमारी करायला सुरुवात केली आहे.

अवैध व्यवसाय नको रे बाबा...
अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत, यात कुणाचा सहभाग आढळून आल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी यापूर्वी वारंवार दिला. सुरुवातीला 'रूटीन' समजून पोलिस अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता एकामागून एकावर आणि 'खास' कर्मचारीच कारवाईच्या कचाट्यात सापडत असल्याने अधिकारीही 'अवैध व्यवसाय आपल्या हद्दीत नको रे बाबा..', असा सूर आवळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com