जिल्हा परिषद लढणार, विरोधात उभे राहून दाखवाच : नागवडेंना कोणी दिले आव्हान

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः थांबून नागवडेंना संधी दिली. हा त्याग नव्हता का. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी या गटासाठी काय भरीव कामे केलीत, याचा हिशोब द्यावा.
Anuradha nagawade.jpg
Anuradha nagawade.jpg

श्रीगोंदे : विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. शिवाय मलाही उमेदवारी करायची नाही. आरक्षण सोयीचे असले, तर बेलवंडी जिल्हा परिषद गटातून पुन्हा मैदानात आहोत. कारखाना निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी सगळी ताकद लावणार आहे. विधानसभेची तयारी करणाऱ्या नागवडे कुटुंबाने आपल्याविरुद्ध जिल्हा परिषद निवडणूक लढवावीच, असे खुले आव्हान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिले. (Zilla Parishad will fight, show it by standing in opposition: Shelar's challenge to Nagwade)

शिवाजीराव नागवडे यांचा त्याग, संघर्ष माहिती आहे. पण विकासात त्यांच्याशिवाय कुटुंबाचे योगदान काय, असा सवाल करीत शेलार म्हणाले, ‘‘मागील जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः थांबून नागवडेंना संधी दिली. हा त्याग नव्हता का. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी या गटासाठी काय भरीव कामे केलीत, याचा हिशोब द्यावा. ‘बापूं’च्या नावाची सहानुभूती घेण्यापेक्षा स्वकतृत्व काय, हेही सांगावे. विधानसभा लढण्याच्या त्यांच्या घोषणेबद्दल द्वेष नाही. मात्र ते आता हयात नसणाऱ्या नेत्यांच्या नावावर सहानुभूती मिळवित आहेत. सदाशिव पाचपुते व नागवडे यांचे कधीच जमले नाही. प्रा. तुकाराम दरेकर यांना कारखान्याला उमेदवारी मिळू नये, यासाठी ‘बापूं’च्या अंगावर फाइल कुणी फेकली, याचे आत्मपरीक्षण करावे.’’

हेही वाचा

शेलार म्हणाले, कारखान्यात घोटाळा घालणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना बिनविरोध होऊ देणार नाही. ज्या केशव मगर यांनी ‘बापूं’ची सावली बनून कारभार केला. त्यांना अपात्र ठरविण्याची चाल खेळणाऱ्यांचा कारभार बाहेर काढणार आहोत. कारखाना बिनविरोध केवळ मगर यांना अध्यक्ष केले, तरच होऊ शकतो, अन्यथा लढाई निश्चित आहे.
‘‘मी सध्या सगळ्या पक्षांचा कार्यकर्ता आहे. मित्रत्वाचे नाते सगळ्यांशी आहे. ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आपल्याला आहेच. शिवाय राहुल जगताप हेही मित्र आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षातून लढायचे, हे त्यावेळी ठरवू. मात्र आपल्याविरुद्ध नागवडे यांनी बेलवंडी गटातून उभे राहून दाखवावे. मग विधानसभेचे पाहू, हे आपले आव्हान समजावे,’’ असेही शेलार म्हणाले.

आमदार बबनराव पाचपुते यांचा खासगी कारखाना असल्याने सहकार त्यांच्या हाती द्यायचा का, असा सवाल करणाऱ्या नागवडे कुटुंबाचे आता दोन खासगी साखर कारखाने झाले आहेत. पर्यायाने सहकार चालविण्याचा अधिकार नसल्याचे आपोआप सिद्ध होत असल्याने कारखाना केशव मगर यांच्या ताब्यात द्यावा.
अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com