तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत 

तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डाॅ. किरण लहामटे यांचे नाव न घेता त्यांना सुनावले.
Lahamte and pichad.jpg
Lahamte and pichad.jpg

अकोले : ``कोरोनासारख्या संकट काळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळोवेळी स्टंटबाजी करीत आहेत. आपल्या हस्ते उदघाटन झाले नाही, तर कोविड सेंटरला ऑक्सिजन देणार नाही, अशी धमकी ते देत आहेत,`` असा गंभीर आरोप माजी आमदार वैभवराव पिचड (Vaibhav Pichad) यांनी आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांचे नाव न घेता केला. `तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत,` असे त्यांनी आमदारांना सुनावले. (You are the people's representative, not the father of the taluka)

तालुक्यातील सुगाव खुर्द येथे नुकतेच 50 ऑक्सिजन युक्त बेड कोविड सेंटरचे उदघाटन करण्यावरुन झालेल्या मानापमान नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

पिचड म्हणाले, की तालुक्यातील सर्व शिक्षक, दानशूर व्यक्ती, संस्था यांच्या योगदानातून सुगाव खुर्द येथे ऑक्सिजन बेडचे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले. लोकप्रतिनिधी ही जबाबदार व्यक्ती असून, त्यांनी तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार आहे, असे म्हणणे शोभत नाही.

हेही वाचा...

कोरोना रुग्ण ऑक्सिजन वाचून हैराण झालेले आहेत, काहींनी प्राण गमावला आहे, असे असताना फीत कापून देत नाही म्हणून ऑक्सिजनचे राजकारण करण्याची भाषा शोभत नाही, तुम्ही ऑक्सिजन घरून देणार नाहीत, अशी टीका करीत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही तालुक्याचे बाप नाहीत, अशा शब्दात आमदारांना सुनावले.

तालुक्यात आरोग्य सेवा हतबल झाली आहे, रेमडीसीविरचा हिशोब नाही. रुग्णाकडून रमेडिसीवीरचे बिल उकळले जात आहे. आरोग्य कर्मचारी कमी आहे, ठराविक आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. त्यांना बदली कर्मचारी मिळत नाही, राजूर, समशेरपूर, कोतुळ, अगस्ति देवस्थान येथे सुरू झालेले कोविड सेंटर लोकसहभागातून उभे राहिले आहेत, त्यांना वेळेवर औषधे मिळने आवश्यक आहे.

रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी काही युवक ऑक्सिजन सिलेंडर मिळविण्यासाठी रात्रभर फिरले. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आणि तुम्ही याबाबत काहीच करीत नाही हे दुर्दैव आहे. फक्त स्टंटबाजी करण्यातच तुम्ही पुढे आहात असा टोलाही त्यांनी लगावला.

सुगाव खुर्द येथील अडीच कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र माझ्या आमदारकीच्या काळात उभे राहिले, ग्रामपंचायत सुगावने त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र दिले हे लोकप्रतिनिधी विसरलेले दिसतात. ज्यांचे सहकार्यामुळे ही इमारत उभी राहिली ते जि. प.सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे यांचीही लोकप्रतिनिधी वाट पाहू शकले नाही, हे दुर्दैव आहे.

आपण लवकरच कोतुळ, समशेरपूर, अकोले,राजूर व जेथे जेथे कोवीड सेंटर आहेत. तेथे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले. तसेच तालुक्यातील नागरिकांनी या कामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पिचड यांनी केले. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com