विधानसभेसाठी मला शब्द, सध्या मात्र "कोविड'च लक्ष्य : राहुल जगताप - Words for the Assembly, but for now, the target is "Kovid": Rahul Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

विधानसभेसाठी मला शब्द, सध्या मात्र "कोविड'च लक्ष्य : राहुल जगताप

संजय आ. काटे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून, ती पक्षातील नेते व मतदार पूर्ण करतील, अशी भूमिका मांडली होती.

श्रीगोंदे : "विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिला आहे. मात्र, सध्या तालुक्‍यावर कोरोनाचे मोठे संकट असल्याने, निवडणूक हा विषय आपण बाजूला ठेवला आहे. लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय,'' अशी माहिती माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते राहुल जगताप यांनी दिली. 

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून, ती पक्षातील नेते व मतदार पूर्ण करतील, अशी भूमिका मांडली होती. यावर जगताप म्हणाले, की शेलार हे आमचे नेते आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. माझ्यासारख्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले. मात्र हा पराभव आमच्याही जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार विधानसभेत जाईल, यासाठी नेत्यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांच्या बैठका, चर्चासत्रे सुरू केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना वाढल्याने सध्या तालुक्‍यातील व मतदारसंघातील जनतेला दिलासा देण्यासाठी माझ्या पद्धतीने मी प्रयत्न सुरू केले आहेत. मतदार संघातील मोफत सुरू असणाऱ्या कोविड सेंटरला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत देणार आहे. श्रीगोंदे शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडसाठी दोन लाख रुपये दिले आहेत. कोरोना संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने काही दिवस राजकारण बाजूला ठेवल्याचा निर्वाळा जगताप यांनी दिला. 

दरम्यान, आगामी विधानसभेत काय भूमिका राहील? या प्रश्‍नावर जगताप म्हणाले, की या राजकीय चर्चेला सध्या अर्थ नाही. मात्र विधानसभा लढायची हा नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून मी त्यादृष्टीने कामाला सुरवात करणार आहे. कोरोना, कुकडी, घोड प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी या प्रश्‍नावर भाजपच्या आमदारांनी तालुका वाऱ्यावर सोडले आहे.

आम्हाला कुठले राजकारण करायचे नसले, तरी आमदार नेमके कुठे आहेत? लोकांना त्यांनी वाऱ्यावर का सोडले, हे विचारण्याचा अधिकार विरोधक म्हणून नक्कीच आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळेस हे सगळे प्रश्‍न उपस्थित करून टोकाची निवडणूक करू आणि यासाठी सर्व सहकारी मित्र सोबत असतील, याची ग्वाही असल्याने विधानसभेची चिंता करीत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख