मुंडे, राजळे यांनी मंजूर केलेल्या योजनेचे नव्याने सर्वेक्षण कशासाठी? ती माहिती खोटी होती का?

माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन पाणी पुरवठामंत्री बबन लोणीकर, माजी आमदार राजीव राजळे, आमदार मोनिका राजळे यांनी पुढाकार घेवुन योजनेसाठी 92 कोटी रुपयाच्या आराखड्याला राष्ट्रीय पेयजल योजनेतुन मंजुरी मिळाली, असे जाहीर केले.
मुंडे, राजळे यांनी मंजूर केलेल्या योजनेचे नव्याने सर्वेक्षण कशासाठी? ती माहिती खोटी होती का?
Pankaja Munde.jpg

पाथर्डी : भगवानगड व परिसरातील पस्तीस गावाला जायकवाडी धरणापासून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मी व समविचारी मित्रांनी 2014 साली प्रयत्न सुरु केले होते. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन पाणी पुरवठामंत्री बबन लोणीकर, माजी आमदार राजीव राजळे, आमदार मोनिका राजळे यांनी पुढाकार घेवुन योजनेसाठी 92 कोटी रुपयाच्या आराखड्याला राष्ट्रीय पेयजल योजनेतुन मंजुरी मिळाली, असे जाहीर केले. मग आता नव्याने सर्वेक्षण सुरु करण्याचा घाट कशासाठी. आम्ही केलेले प्रयत्न वाया गेले का? मंत्र्यांनी व लोकप्रतिनिधींनी दिलेली माहिती खोटीच होती का? असा प्रश्न उपस्थित करुन येळीचे सरपंच संजय बडे यांनी योजनेच्या पुर्णत्वााठी राजकारणविरहीत संघर्ष उभा करण्याचा निर्धार केला आहे. (Why a new survey of the scheme approved by Munde, Rajale? Was that information false?)

येळी गावचे सरंपच संजय एकनाथ बडे यांनी 2014 मधे खरवंडी येथे सुभाष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवुन भगवानगड व पस्तीस गावाला पैठणच्या धरणापासुन पाईपाईन आणून पिण्याचे पाणी मिळावे याासाठी योजना मंजुर करण्याची मागणी केली.

युतीचे सरकार होते, तेव्हा पंकजा मुंडे व बबन लोणीकर यांच्या सहकार्याने 92 कोटी रुपये योजनेला मंजूर झाले, अशी माहिती पत्रकार परिषदेत मोनिका राजळे यांनी त्यावेळी दिली होती. आम्हालाही आनंद झाला. बबन लोणीकर यांचा मुंबईला जाऊन मोनिका राजळे व आम्ही त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवुन सत्कार केला होता. पुढे सरकार बदलले. आता जीवन प्राधीकरणाचे अधिकारी सांगतात योजनाच मंजुर नाही. मग जे होते ते सर्व खोटेच सांगितले होते का? आता जलजिवन मिशनमधे नव्याने सर्वेक्षण व अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश दिले जात आहेत. मग पुर्वीची मंजुर असलेली योजना कुठे आहे ?

पिण्याचे पाणई मिळावे, यासाठी कोणीही राजकारण करु नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन योजनेच्या काम पुर्ण करण्यासाठी संघर्ष उभा करणार असल्याचे येळीचे सरंपच संजय बडे यांनी सांगितले आहे.

याबाबत त्यांनी आमदार मोनिका राजळे व संबधीत विभागाचे अधिकारी यांना लेखी निवेदनही दिले आहे.

दरम्यान, मागील जिल्हा परिषद निवडणुकीत संजय बडे यांनी भालगाव जिल्हा परिषद गटातुन भारतीय जनता पक्षाकडुन उमेदवारी केली होती. यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणार नाही, असे संजय बडे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in