शिवसेनेच्या औटींनी कोणाची वाट केली मोकळी ! आता लंकेंना प्रतिस्पर्धी कोण?

औटी यांनी ही घोषणा विचारपूर्वक केलेली दिसते. आपण विधानसभा लढविणार नाही, असे त्यांनी म्हटले. म्हणजेच राजकारणातून ते बाहेर पडणार नाही.
Auti and lanke.jpg
Auti and lanke.jpg

नगर : पारनेर (Parner) विधानसभा मतदारसंघावर पंधरा वर्षे सत्ता गाजविलेले विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते विजय औटी यांनी, आगामी विधानसभेचा उमेदवार मी असणार नाही, असे जाहीर करून टाकले. परंतु राजकारणातून निवृत्त होणार नाही, असे म्हटले नाही. याचाच अर्थ त्यांच्या कुटुंबियातून कोणाला उमेदवारी देणार की इतर कोणाची वाट मोकळी करून दिली, याबाबत खलबते सुरू आहेत. (Who is waiting for Shiv Sena's autis? Now who competes with Lanka?)

सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून काही कामे मार्गी लावण्यासाठी किंवा तालुक्यात वर्चस्व सिद्ध करण्याची संधी औटी यांना आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण विधानसभेच्या पुन्हा शर्यतीत असल्याचे संकेत दिले होते. औटी पुन्हा विधानसभा लढवितील, असाच सूर कार्यकर्त्यांचा होता, तथापि, एका कार्यक्रमात त्यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक घोषणा करून आपण विधानसभेचा उमेदवार असणार नाही, असे सांगून टाकले. शिवसेनेचा नेता इतक्या लवकर हार मानणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांना शह देण्यासाठी औटी यांचा आगामी कोणता डाव असेल, हे काळच ठरविणार आहे.

औटी यांनी ही घोषणा विचारपूर्वक केलेली दिसते. आपण विधानसभा लढविणार नाही, असे त्यांनी म्हटले. म्हणजेच राजकारणातून ते बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे आगामी काळात कुटुंबातील एखाद्या सदस्याला ते संधी देणार की लंके यांच्या विरोधात शिवसेनेचाच एखादा कार्यकर्ता उभा करणार, हे अद्याप अनिश्चित आहे.

लंके यांची वाढती लोकप्रियता

आमदार लंके यांनी भाळवणी येथे कोविड सेंटर उभारून देशपातळीवर लोकप्रियता मिळविली आहे. आमदारकीचे बहुतेक दिवस सर्वच आमदारांचे कोविड निवारणासाठी गेले आहेत. लंके यांनी मात्र सर्वच आमदारांमध्ये सरस कामगिरी करून कोविड निवारणासाठी मोठी मदत केली. त्यामुळे पारनेरकरांचा विश्वास संपादन केला आहे. ही लोकप्रियता त्यांना पुढील निवडणुकीत कामे येणार आहे. भविष्यातील निवडणूक नजरेसमोर ठेवून त्यांनी मतदारसंघात विविध कामांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार लंके असतील, यात शंका नाही. या सर्वच पार्श्वभूमीवर ते उमेदवार असतील, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी तगडा उमेदवार कोण असेल, हे आता काळच ठरविणार आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com