मुश्रीफ यांच्यावर कोणाची नाराजी? शिवसेनेला का हवाय नगरमध्ये बदल

पालकमंत्री बदलाबाबत वरिष्ठ पातळीवर तसेच शिवसेनेच्या गोटातून काहीतरी वेगळे शिजते आहे, हे राजकीय धुरिनांनी ओळखून घेतले.
Mushrif and gadakh.jpg
Mushrif and gadakh.jpg

नगर : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून शिवसेनेचे जलसंधारणंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांना हे पद मिळावे, अशी मागणी काल कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेवासे तालुक्यातील मेळाव्यात केली. यावरून विद्यमान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी कोणाची नाराजी आहे? की राष्ट्रवादीशी धुसफूस करून हे पद शिवसेनेला हवे आहे, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. (Who is angry with Mushrif, why Shiv Sena changes in Hawaii Nagar)

जिल्ह्यातील राजकारणात गडाखांची खूप ढवळाढवळ नसली, तर त्यांच्या मतदारसंघाची पकड त्यांनी ढिली होऊ दिली नाही. कुटुंबावर आलेले कोरोनाचे संकट झेलत त्यांनी कामे सुरू ठेवली. ही वेळ बहुतेक सर्वच मंत्री, आमदारांवर आली असली, तरी गडाख यांनी परिस्थिती चांगली हाताळली. जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. या उलट पालकमंत्री मुश्रीफ यांनी अधुन-मधून येऊन कोरोनाचा आढावा घेतला. योग्य वेळी लाॅकडाऊन केले असते, तर कोरोनामुळे मध्यंतरी झालेले मृत्यू कमी झाले असते, अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

हे आणि असे अनेक मुद्यांची कुजबूज करून जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गडाखांना मिळावे, अशी मागणी काल मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उचलून धरली. कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासमोर हे प्रदर्शन घडवून आणले. याचाच अर्थ पालकमंत्री बदलाबाबत वरिष्ठ पातळीवर तसेच शिवसेनेच्या गोटातून काहीतरी वेगळे शिजते आहे, हे राजकीय धुरिनांनी ओळखून घेतले.

मंत्री गडाख यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण नगरमध्ये बदल घडवून आणू, विकास कामांसाठी विशेष प्रयत्न करू, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी नगर शहरातील राजकारणाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. तथापि, महापालिकेवर भगवा फडकू, हे त्यांचे विधान आता खरे होऊ पाहत आहेत. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत हे पद शिवसेनेला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. गडाखांनी प्रत्यक्ष यामध्ये सहभाग न घेता पडद्यामागून हालचाली केल्याचे दिसून येत आहे.

वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा

नगरचे पालकमंत्री बदलून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे द्यावे, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात होत आहे. वळसे पाटील यांनी यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचा खडा न खडा माहिती आहे. त्यामुळे कोरोना सारखी परिस्थिती ते योग्य पद्धतीने हाताळतील, अशी चर्चा सुरू होती.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com