Yeshvantra gadakh 1.jpg
Yeshvantra gadakh 1.jpg

`जिथे सायन्स संपते...!` यशवंतराव गडाख रुग्णालयात, प्रशांत गडाख यांची भावनिक पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून गडाख रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

नगर ः ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख सध्या कोरोनामुळे पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असून, त्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गडाख रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार सुरू आहेत. प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की गेल्या काही देिवसांपासून माझे वडील पुण्याला दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे अॅडमीट आहेत. त्यांना भेटता येत नाही. मला तुमच्याकडून सहानुभूती नको. साहेब अनेक प्रार्थना स्थळांवर सांगत असतात, की जिथं सायन्स संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. महाराष्ट्रभर कोरोनाने धुमाकूळ घातलाय. आपल्याला आता प्रार्थना मागायची आहे. आपण आपल्या घरीच राहून प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेनं सकारात्मक उर्जा निर्माण होते. सायन्स आणि आध्यात्म यांच्या मेळातून आपल्या साहेबांना लवकर बरू करू, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून नगरमध्ये कोरोनामुळे स्थिती गंभीर झाली आहे. आॅक्सििजन बेड मिळणे मुश्किल होत आहे. व्हेंटिलेटरचे बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून तर तब्बल रोज तीन हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा भयभीत झाला  आहे. खासगी रुग्णालयाचे दरही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा रोष प्रशासनावर येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आदेश लागू केला आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा "ब्रेक द चेन' संकल्प कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. महापालिका कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिक जुमानतच नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम नगर शहरात पडलेला दिसून येत नाही. दुकाने बंद असली तरी नागरिकांची गर्दी रस्त्यावर होत आहे. नागरिक रस्त्यावर कशासाठी येतात, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

शहरातील जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या नागरिकांना सध्या शिवभोजन आधार ठरत आहे. शिवभोजन केंद्रांसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. यातच आमदार संग्राम जगताप यांनीही कोरोनाबाधितांसह त्यांच्या नातेवाइकांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

सावेडी येथील एका ठिकाणी आज भाजीबाजार भरलेला दक्षता पथकाला दिसून आला. तेथे मोठी गर्दी झाली होती. या पथकाने बाजार बंद करण्यास सुरवात केली. भाजीविक्रेत्यांनी तातडीने स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधला. नगरसेवकांनी "भाजीबाजार सुरू ठेवा' असे पथकाला सांगितले; पण पथक काही ऐकेना. नगरसेवकाने महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांच्याशी संपर्क साधून भाजीबाजार सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार आयुक्‍तांनी दक्षता पथकाला, भाजीविक्रेत्यांना सोशल डिस्टन्सनुसार बसवून भाजीबाजार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. 

स्थानिक राजकीय दबावापुढे महापालिकेचे दक्षता पथकही हतबल ठरत आहे. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात दक्षता पथकाला अपयश येत आहे. राजकीय हस्तक्षेप दूर झाल्यास "लॉकडाउन'ची कारवाई कडक होऊ शकेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com