Kardile and tanpure 1.jpg
Kardile and tanpure 1.jpg

हे आव्हान मंत्री तनपुरेंनी स्विकारल्यावर कर्डिले त्यांच्या वाड्यावर जाणार

त्यांनी कारखान्याला शंभर कोटी रुपयांच्या कर्जात घातले. ते कर्ज बँकेत भरा. माझ्यासह खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व कारखान्याचे संचालक मंडळ तुमच्या वाड्यावर येऊ.

नगर : "राहुरी कारखान्याच्या शेतकरी, कामगार व कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मदत केली. परंतु, कारखाना चालू करण्यासाठी कर्डिलेंकडे कशाला जाता. माझ्याकडे या. असे तनपुरे म्हणतात. त्यांना माझे आव्हान आहे. त्यांनी कारखान्याला शंभर कोटी रुपयांच्या कर्जात घातले. ते कर्ज बँकेत भरा. माझ्यासह खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व कारखान्याचे संचालक मंडळ तुमच्या वाड्यावर येऊ." असेही आव्हान माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले. (When Tanpur accepts Kardile's challenge, Kardile will go to his castle)

राहुरी येथे काल भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्‍तम आढाव होते. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, चाचा तनपुरे, शामराव निमसे, शिवाजी सोनवणे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे उपस्थित होते.

"महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ राहुरी येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन केले जाईल. राहुरी नगरपालिकेची निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविली जाईल." असे कर्डिले यांनी सांगितले.

कर्डिले यांनी बैठकीत मंत्री तनपुरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "राहुरी नगरपालिका पिढ्यानपिढ्या ताब्यात असताना नगर तालुक्यात नगरपालिका काढायला निघाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार. अशी अफवा उठवून, भीती घालून मते मिळविली. आता सरकार तुमचे आहे. तुमचे मामा त्या खात्याचे मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार असल्याचा एक तरी लेखी पुरावा जनतेला द्यावा. अन्यथा राहुरीच्या जनतेची माफी मागावी."
 

हेही वाचा...

गडाख यांच्या प्रतिष्ठानचा हा महत्त्वाचा उपक्रम

सोनई : यशवंत प्रतिष्ठाण व शारदाताई फाऊंडेशनच्यावतीने सोनईसह अकरा गावात तीन हजारांहून अधिक महिलांना वृक्ष रोपांचे वाटप करुन वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. या अगळ्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.वटपौर्णिमा हा सण वटवृक्षांची पुजा करून महिला भगिनी नेहमी साजरा करतात. परंतु कोरोनाच्या संकटाने ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटवून दिले.निसर्ग वाचला, तर सृष्टी वाचेल या भावनेतून वटसावित्री पौर्णिमेला एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. सोनई येथील महादेव मंदीर येथे झालेल्या कार्यक्रमात माजी पंचायत समितीचे सभापती सुनिता गडाख यांनी उपक्रमाची माहिती दिली.नगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने,विभागीय वन अधिकारी किर्ती जमदाडे,डाॅ.सायली लिपाने,सविता राऊत,किर्ती बंग,डाॅ.रजनी शिरसाठ उपस्थित होत्या.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com