महापालिका सभागृह नेतेपदी निवड झाल्यावर त्यांनी प्रथम बसविले आईला खुर्चीवर

आपला मुलगा महापालिकेचा सभागृह नेता झाला, हे कौतुक पाहण्याकरिता मंदा बारस्कर महापालिकेत पोचल्या. सभागृह नेता या नात्याने महापालिकेत करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी आईला दिली.
mahapalika.jpg
mahapalika.jpg

नगर : महापालिका सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, आईला आग्रह करून महापालिकेतील आपले कार्यालय दाखविले. एव्हढेच नव्हे, तर त्या खुर्चीवर बसवून त्यांनी आईविरुद्ध कृतज्ञता व्यक्त केली.

आपला मुलगा महापालिकेचा सभागृह नेता झाला, हे कौतुक पाहण्याकरिता मंदा बारस्कर महापालिकेत पोचल्या. सभागृह नेता या नात्याने महापालिकेत करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी आईला दिली. सभागृह नेत्याच्या, म्हणजे स्वतःच्या खुर्चीवर मोठ्या कौतुकाने आईला बसविले. खुर्चीवर बसताना आईचेही मन अभिमानाने भरून आले. आपल्या मुला-मुलींच्या कर्तृत्वाबद्दल कोणी कौतुक केल्यास, लहानाचे मोठे होईपर्यंत केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचा आनंद त्यांना होतो.

रवींद्र बारस्कर म्हणाले, ‘‘आई-वडिलांना भरभरून प्रेम देत त्यांचा आपलेपणाने सांभाळ केला, की परमेश्वर आपल्यास भरभरून आशीर्वाद देत आपली प्रगती घडवतो. आपले जीवन सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते. वडिलांनीही नगरपालिका असताना नोकरी केलेली असल्यामुळे, या संस्थेविषयी लहानपणापासून आदर व आपुलकी आहे. मी लहान असतानाच आईने माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली. ही माळ माझ्या जीवनात भगवंताचे अधिष्ठान ठेवणारी आणि मला व्यसनांपासून दूर ठेवणारी ठरली. म्हणूनच मी कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय जीवनात सतत यशस्वी होत आलो आहे.’’ आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आईस दिले. मुला-मुलींविषयी मी खूप समाधानी आहे, असे मंदा बारस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा..

पेट्रोल-डिझेल दरवाढ निषेधार्ह

नेवासे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसला असून, केंद्राच्या पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केले.

नेवासे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी भेंडे (ता. नेवासे) येथे नेवासे-शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी अभंग बोलत होते.

ज्ञानेश्वरचे संचालक ॲड. देसाई देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, गणेश गव्हाणे, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजी कोलते, अमोल अभंग, सोपान महापूर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, नेवासे शहर अध्यक्ष गफूर बागवान, गणेश गव्हाणे, डॉ. अशोक ढगे, भाऊसाहेब सावंत, शंकरराव भारस्कर यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com