नगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र
Sanjay raut.jpg

नगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र

जिल्ह्यात नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. काॅंग्रेस व राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने राऊत जिल्ह्यात येणार आहेत. मागील महिन्यात नगरचा महापौर शिवसेनेचा होऊन सत्ता मिळाली. आता आगामी नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकीची व्हूयहनिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व राऊत करण्याची शक्यता आहे. याबाबत राऊत कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार, याबाबत उत्सुकता आहे.(What will Sanjay Raut say about the elections in Nagar district?)

राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार सदाशिव लोंखडे हेही उपस्थित राहणार आहेत. मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून शिंगणापुर व नेवासेफाटा येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे तालुका ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होणार आहे. शिंगणापुर रुग्णालय कार्यक्रमानंतर सोनई येथील आमराई विश्रामगृह येथे नगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकित अनेक विषयांचा निपटारा होणार असल्याचे समजते.

नगरच्या शिवसेनेत दोन गट आहेत. महापौर शिवसेनेचा झाला असला, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता मिळाली आहे. त्यामुळे एक गट राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चालणार आहे. साहजिकच या गटातील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न या बैठकित होणार असल्याचे समजते.

जिल्ह्यात नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. काॅंग्रेस व राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कित्ता या निवडणुकीत गिरवायचा का, हे अद्याप तिनही प्रमुख पक्षाने निश्चित केले नाही. त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले, तर शिवसेनेलाही स्वतंत्रच लढावे लागणार आहे. याबाबतची चर्चा या बैठकित होऊ शकेल.

भाजपला एकटे पाडायचे, की भाजपशी हातमिळवणी करायची, याबाबत काही नगरपंचायतीमध्ये इतर पक्षाचा खल सुरू आहे. स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणारे पक्ष ऐनवेळी भाजपच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकीबाबत नेमके काय भूमिका घ्यायची, याबाबत कार्यकर्त्यांत संदिग्धता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या बैठकिकडे शिवसेनेबरोबरच इतर पक्षातील नेत्यांचेही लक्ष लागले आहे.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in