आणलेल्या बाराशे कोटींचे काय? ॲड. ढाकणे; सल्लागार बदलण्याचा राजळेंना सल्ला

पालिकेचा शहरस्वच्छतेचा ठेका मागील वर्षी ९६ लाखांना गेला. या वर्षी एक कोटी ८० लाखांना कसा दिला, मधले पैसे नेमके कोणाला मिळाले? बाजार समितीत एवढा गोंधळ केला, की मला ती ताब्यात घेऊन पश्चात्ताप वाटला.
 Rajale and dhakne.jpg
Rajale and dhakne.jpg

पाथर्डी : माझा मित्र (स्व. राजीव राजळे) असा कधीच वागला नाही. तुमच्या ताब्यात असणारी पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ व वृद्धेश्वर साखर कारखाना या संस्था नेमके कोण चालवते? तालुक्यासाठी आणलेले बाराशे कोटी रुपये नेमके कुठे गेले, असे प्रश्‍न उपस्थित करून, तुमचे सल्लागार बदला, असा सल्ला केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांना त्यांचे नाव न घेता दिला. (What about the twelve hundred crores brought? Adv. Cover; Advise Rajale to change advisor)

येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. ढाकणे बोलत होते. नगरसेवक बंडू बोरुडे, योगेश रासने, वैभव दहिफळे उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, ‘‘तालुक्याच्या जडणघडणीत माधवराव निऱ्हाळी, बाबूजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री बबनराव ढाकणे व आप्पासाहेब राजळे यांचे योगदान मोठेच आहे. आज जे चाललेय ते बरे नाही. तालुक्यासाठी आलेले बाराशे कोटी खर्च केले असते, तर तालुक्याचे नंदनवन झाले असते. कोविडसाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदारांना मिळाला. तो नेमके कुठे खर्च झाला? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा हिशेब जनतेला मिळाला पाहिजे.’’

हेही वाचा..

पालिकेचा शहरस्वच्छतेचा ठेका मागील वर्षी ९६ लाखांना गेला. या वर्षी एक कोटी ८० लाखांना कसा दिला, मधले पैसे नेमके कोणाला मिळाले? बाजार समितीत एवढा गोंधळ केला, की मला ती ताब्यात घेऊन पश्चात्ताप वाटला. पंचायत समितीत चुकीच्या बिलाला नाही म्हणणाऱ्यांना तुम्ही कशी शिक्षा देताय? तुमचे सल्लागार बदला. गुंडगिरी करणारे पोसू नका. चोरून कारखान्यातील साखर विकायची व बँकेलाही फसवायचे प्रकार सुरू आहेत. वेळ आली तर पुरावे देईन. माझ्या माणसांनी पालिकेत चूक केली, तर त्यांचे राजीनामे घेतले. तुम्ही नेमके काय करता, समजतंय का? अशी टीका करीत ढाकणेंनी आगामी काळात अधिक तीव्रतेने विरोध करू, असे सांगितले.

किती खोटे बोलणार?

भगवानगड व पस्तीस गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत आमदार मोनिका राजळे यांनी केलेली घोषणा किती फसवी आहे, हे येळीचे सरपंच संजय बडे यांनी उघड केले आहे. तुम्ही किती खोटे बोलणार? आता माझे सरकार आहे. ते खोटे बोलत नाही. मी भगवानगडाची योजना पूर्ण करणार आहे, असे ॲड. प्रताप ढाकणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com