दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घेऊ - हसन मुश्रीफ

कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. शेवगाव-पाथर्डीत ४६४ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. येणारी लाट रोखण्यासाठी कोरोनाचे नियम पाळावेत. लसीकरणासाठी चांगले काम करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
Hasan mushrif 1.jpg
Hasan mushrif 1.jpg

पाथर्डी : पावसाचे दोन महिने उलटूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाथर्डी तालुका आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे पाथर्डी येथील संस्कार भवनात शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील कोरोना स्थितीच्या आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती डॉ. क्षितिज घुले, शिवशंकर राजळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संजय बडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण उपस्थित होते.

हेही वाचा...

मुश्रीफ म्हणाले, पाथर्डी-शेवगाव हा दुष्काळी भाग आहेत. येथील शेतकरी संकटात आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घेऊ. मुळा धरणाचे आवर्तन सोडणे आणि भगवानगड व पस्तीस गावांच्या पाणीयोजनेच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो. आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, ॲड. प्रताप ढाकणे यांनी सुचविलेली विकासकामे करू. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता विकासासाठी कामे करण्यात येतील. कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. शेवगाव-पाथर्डीत ४६४ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. येणारी लाट रोखण्यासाठी कोरोनाचे नियम पाळावेत. लसीकरणासाठी चांगले काम करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा...

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार श्याम वाडकर यांनी आभार मानले. ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे भरतात. मात्र यंदा धरणे भरलेली नाहीत. पाऊसही पुरेसा न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. पाऊस येत नसल्याने धरणांतून आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.

या झाल्या मागण्या

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू. भगवानगड पाणीयोजनेसाठी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न सोडवू. ॲड. प्रताप ढाकणे व राजश्री घुले यांनी, मुळाचे आवर्तन सोडावे, भगवानगड व पाथर्डी-शेवगावच्या पाणीयोजनेसाठी निधी द्यावा, भगवानगड पाणीयोजनेला निधी द्यावा, मुळा चारीचे आवर्तन सोडावे, पाथर्डी- शेवगाव पाणीयोजना पुन्हा नव्याने मंजूर करावी, दुष्काळी स्थितीबाबत निर्णय घ्यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com