`भंडारदरा`वर आम्ही सायकलवर जायचो, तेथे आमची मिरवणूक निघायची ! मुरकुटे रमले आठवणींत

मुरकुटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. भंडारदरा जलाशय भरले की, आम्ही सायकलवर भंडारदरा येथे येत होतो. त्यावेळी राजूर गावातून आमची सवाद्य मिरवणूक निघायची.
Bhanudas Murkute.jpg
Bhanudas Murkute.jpg

अकोले : माजी आमदार व अशोक कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी कार्यकर्त्यासोबत राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी भंडारदरा, घाटघर परिसराची पाहणी केली. (We used to cycle to Bhandardara, our procession used to go there! I remember playing murkute)

मुरकुटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. भंडारदरा जलाशय भरले की, आम्ही सायकलवर भंडारदरा येथे येत होतो. त्यावेळी राजूर गावातून आमची सवाद्य मिरवणूक निघायची. पिचड यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन राहायचे. भंडारदरा पाण्याचे फेरवाटप करून संगमनेर, अकोले तालुक्याला न्याय देण्याचे काम पिचड यांनी केले. तर दूरदृष्टी ठेवून घाटघर येथील कोकण कड्यावरून कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला. त्याला पाठबळ देण्याचे काम करावे लागेल. या बहुउद्देशिय योजनेला माझा पाठिंबा आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुरकुटे यांनी म्हणले आहे.

हेही वाचा...

अकोले तालुक्यात होणार भाजपाच्या शाखेंचे उद्‌घाटने

अकोले : तालुक्याचे माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे शाखा उद्घाटन होत असून त्याला गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच युवकांच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाची जोरदार बांधणी करून भाजपचे कार्य, विचारधारा, विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

युवकांना जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व माजीमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत युवा वारीयर्स शाखेचा उद्‌घाटन सोहळा झाला.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो विक्रम पाटील उपस्थित राहणार आहेत. या उद्‌घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेत्तुत्व, माजी आमदार तथा राष्ट्रीय मंत्री, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा हे असणार आहेत. राहुल लोणीकर, राजेंद्र गोंदकर, जालिंदर वाकचौरे, श्रीराज डेरे उपस्थित राहणार आहेत. अकोले तालुक्यातील अनेक गावात व शहरातील अनेक प्रमुख भागात हा युवा वारीयर्स शाखा उदघाटन सोहळा होणार आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com